शरद पवारांना भेटताच नितीश कुमारांमध्ये शंभर हत्तींचं बळ? राजकारणातल्या चाणक्यानं 6 वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं

| Updated on: Sep 08, 2022 | 12:50 PM

नितीश कुमार राष्ट्रीय पातळीवर वेगळ्या भूमिकेत दिसू शकतात का, त्यावर शरद पवारांनी सांगितले होते की, 'ते जेव्हापासून मुख्यमंत्री आहेत तेव्हापासून त्यांनी राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात असलेल्या काँग्रेस आणि इतर पक्षांना त्यांचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

शरद पवारांना भेटताच नितीश कुमारांमध्ये शंभर हत्तींचं बळ? राजकारणातल्या चाणक्यानं 6 वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं
Follow us on

नवी दिल्ली: देशात लोकसभेच्या निवडणुकांना (Loksabha Election 2024) अजून दोन वर्षाचा अवधी आहे. राजकीय पक्षांना दोन वर्षाचा कालावधी असला तरी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे भारतातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. बिहारमध्ये भाजपसोबत (BJP) संबंध तोडल्यानंतर आरजेडीबरोबर नितीश कुमारांनी (Bihar CM Nitish Kumar) सरकार स्थापन केले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील राजकीय शक्यता पडताळून पाहण्यासाठी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची मोट बांधण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसच्या अस्तित्त्वासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो म्हणत 3500 किलो मीटरच्या यात्रेची जय्यत तयारी केली आहे.

या सगळ्या राजकीय पक्षांपेक्षा सत्तेत असणाऱ्या भाजपनेही आतापासूनच 2024 ची तयारी सुरू केली आहे. भाजपने 2024 साठीही शड्डू ठोकला असल्याने त्यांनी आपला अजेंडाही स्पष्ट केला आहे. नितीश कुमारांनी शरद पवारांची (NCP Leader Sharad Pawar) भेट घेतल्यानंतर मात्र देशाच्या राजकारणात आता चर्चेला उधाण आले आहे.

कोणत्या जागेवर कोण असणार आहे, त्यासाठी भाजपने आता खासदारानाही तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत कोणत्या पक्षाची काय भूमिका असणार या गोष्टी आता मतदारांनाही लक्षात येऊ लागल्या आहेत.

विरोधकांची मोट बांधणीसाठी प्रयत्न

त्यामुळे नितीश कुमार यांच्याही राजकारणाच्या चर्चा आतापासूनच रंगू लागल्या आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नितीश कुमारांनी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या भेटीगाठीवर जोर देत त्यांनी थेट भेटीगाठीचा धडाका लावला आहे, आणि त्याचे फोटोही आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होवू लागले आहेत.

नितीश कुमारांची पाठराखण

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना जेव्हा माध्यमांकडून तुम्ही पंतप्रधान पदाचे दावेदार आहात का असा सवाल विचारण्यात येतो त्यावेळी नितीश कुमार गालातल्या गालत हसत सांगतात की, माझी तर पंतप्रधान बनण्याची इच्छाही नाही.

नितीश कुमारांनी बुधवारी राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांची भेट घेतल्यानतंर मात्र त्यांच्या या भेटीला राजकीय वजन प्राप्त झाले आहे. त्यामुळे काही जण भविष्यात शरद पवारांकडून नितीश कुमारांची पाठराखण केली जाते असंही भाकीत वर्तवत आहेत.

आधी चर्चा नंतर आघाडी

नितीश कुमारांनी शरद पवारांची अर्धा तास भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जे राजकीय पक्ष भाजपसोबत असणार नाहीत त्या पक्षांना एकत्र आणण्याचे काम शरद पवार आणि मी करत असून त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे आघाडीचा विचार नंतर केला जाईलच मात्र त्याआधी विरोधी पक्षातील नेत्यांची एकत्र मोट बांधणे गरजेचे आहे असंही नितीश कुमारांनी सांगितले.

विरोधकांना एकत्र आणण्याचा डाव

राजकारणात आकड्यांचा खेळ महत्वाचा मानला जात असला तरी नितीश कुमारांनी मात्र विरोधी पक्षातील नेत्यांना एकत्र करण्यासाठी भेटीगाठींची धडक मोहीम राबविली आहे.

नितीश कुमारांनी दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, आम आदमी पार्टीचे आयोजन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, डाव्या विचारसरणीचे, चळवळीतील नेते सीताराम येचुरी आणि डी राजा, समाजवादी पार्टीचे मुलायम सिंह यादव आणि त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत.

या विरोधी गटातील सगळ्यांना एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी नितीश कुमार मात्र पंतप्रधान पदासाठी आपण इच्छूक नसल्याचेही सांगत आहेत.

शरद पवारांची महत्त्वाकांक्षा

देशातील राजकारणात प्रचंड मोठ्या घडामोडी घडत असल्यामुळे नितीश कुमार आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्व आले आहे. शरद पवारांची किंगमेकर बनण्याची इच्छा असली तरी राष्ट्रीय राजकारणात मात्र त्यांना अधिक मोठी महत्त्वकाक्षा नसल्याचेही राजकीय विश्लेषक सांगतात.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करुन सत्तेत आलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचे राजकारण समजून घेण्यासाठी सहा वर्षापूर्वी म्हणजेच 2016 मध्ये घडलेल्या घटनांकडे पाहावे लागणार आहे.

नितीश कुमारांचा क्रमांक पहिला

शरद पवारांनी इकॉनॉमिक टाईम्सला मुलाखत देताना त्यांना जेव्हा नितीश कुमारांबद्दल विचारण्यात आले की, नितीश कुमार राष्ट्रीय पातळीवर वेगळ्या भूमिकेत दिसू शकतात का, त्यावर शरद पवारांनी सांगितले होते की, ‘ते जेव्हापासून मुख्यमंत्री आहेत तेव्हापासून त्यांनी राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात असलेल्या काँग्रेस आणि इतर पक्षांना त्यांचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

तसेच त्यावेळी त्यांनी हेही सांगितलेली की, ते प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत. त्यांचा आणि सर्वसामान्यांचे एक जवळचे नाते असल्याचे स्पष्टपणे दिसून येते असंही शरद पवार म्हणाले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून मी त्यांना ओळखत असल्याचे सांगत नितीश कुमार पंतप्रधान बनू शकतात का असं जेव्हा विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी सांगितले की, विरोधकांनी एकत्र येऊन एक तगडा पर्याय उभा करायचा असेल तर त्यामध्ये नितीश कुमार यांचे नाव पहिल्या क्रमाकांवर असणार असं भाकीतही त्यांनी केले होते.

नितीश कुमार; सर्वसामान्यांचा नेता

राजकीय वर्तुळात जो सवाल आज उपस्थित करण्यात आला आहे तोच सवाल मागील सहा वर्षापूर्वीही विचारण्यात आला होता की, राष्ट्रवादी काँग्रेस नितीश कुमारांना साथ देणार का त्यावरही शरद पवारांनी सांगितले होते की, आमची राजकीय वाटचाल आणि दृष्टीकोन ठरलेला आहे त्यामुळे भाजपशिवाय एक नेत्याला आमचे समर्थन असणार आहे.

आणि त्यावेळी शरद पवारांना हेही विचारण्यात आले होते की, तुम्हाला नितीश कुमार हे प्रभावशाली नेते का वाटतात त्यावरही बोलताना त्यांनी सांगितले होते की, ते एक चांगले मुख्यमंत्री आहेत,आणि त्यांच्याजवळ ते सगळे गुण आहेत  असं सांगून त्यांनी नितीश कुमारां.