Marathi News National Sharad pawar new delhi react on uddhav thackera & mahavikas aghadi government
Sharad Pawar : एकनाथ शिंदेंचं बंड, मुंबईत ठाकरे कँप अस्वस्थ, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतले 5 मोठे मुद्दे
दोनदा अशाप्रकारे सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले ही तिसरी घटना आहे. दरम्यान, आम्हा तिन्ही पक्षांत समन्वय आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात सरकार चालेल, राज्यात सुरू असलेल्या पेचप्रसंगातून मार्ग निघेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवार
Image Credit source: tv9
Follow us on
नवी दिल्ली : मागील अडीच वर्षांपासून सरकार स्थिर आहे. या अडीच वर्षात दोनदा सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. राष्ट्रपतीपदाबाबतची चर्चा झाली. त्यामुळे मी दिल्लीत आलो आहे, असे शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले. त्यानंतर राज्यातील सर्वात मोठ्या घडामोड संदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थिर असल्याचा दावा केला आहे. याआधी दोनदा अशाप्रकारे सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले ही तिसरी घटना आहे. दरम्यान, आम्हा तिन्ही पक्षांत समन्वय आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात सरकार चालेल, राज्यात सुरू असलेल्या पेचप्रसंगातून मार्ग निघेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवार नेमके काय म्हणाले, जाणून घेऊ या पाच ठळक मुद्द्यांमधून…
‘दोनदा सरकार पाडण्याचे प्रयत्न‘ – महाराष्ट्रात जे काही झाले आहे. गेल्या अडीच वर्षातील ही तिसरी घटना आहे. या पूर्वी दोनदा असे झाले होते. उद्धव ठाकरे यांचे सरकार बनले, त्यापूर्वी आमच्या काही आमदारांना हरयाणा बुधगावात नेऊन ठेवले होते. नंतर तिथून ते आले आणि सरकार बनवले. त्यानंतर अडीच वर्षापासून सरकार व्यवस्थित सुरू आहे.
‘तिन्ही पक्षांत समन्वय‘ – एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणत शरद पवार यांनी हात वर केले आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी संवाद झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मला मुख्यमंत्री बनवा असे शिंदेंनी म्हटल्याचे ऐकले नाही. आमच्या तिन्ही पक्षात समन्वय आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. उपमुख्यमंत्रीपद आमच्याकडे आहे. इतर मंत्रालये काँग्रेसकडे आहेत. शिवसेनेने काही करणे किंवा कुणाला संधी देणे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेना कुणाला काही देत असेल तर आम्ही शिवसेनेच्या निर्णयाला पाठिंबा देऊ. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार चालवत आहोत. त्यामध्ये काही बदल करण्याची आम्हाला गरज वाटत नाही.
‘उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार‘ – उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. दुपारी ते त्यांच्या नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर त्यांच्याशी आम्ही बोलू. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. माझी अडीच वाजता मिटिंग आहे. त्यानंतर मी मुंबईला जाणार आहे. तर माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. ते कुठे आहेत हे सुद्धा मला माहीत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही तिघे सोबत आहे. पण एक्झॅटली काय मुद्दा आहे. तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे शिवसेनेकडून कळवले जात नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. आज दुपारी आम्ही डेप्थ स्टडी करू. त्यानंतर संध्याकाळी बोलू, असा मला सेनेकडून निरोप आला आहे.
पत्रकाराचा सेन्स काढला – सरकार पडले तर राष्ट्रवादी पक्ष भाजपाबरोबर जाणार का, असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यावर भाजपा सोबत का जाऊ, काही तरी संवेदनशील प्रश्व विचारा, असे शरद पवार यांनी पत्रकाराला सुनावले. तसेच भाजपाबरोबर न जाता आम्ही विरोधातही बसू असेही ते म्हणाले.
हे सुद्धा वाचा
‘क्रॉस व्होटिंग होते आणि पुन्हा सरकार चालते‘ – अशा निवडणुका होतात, तेव्हा क्रास व्होटिंग होते. गेल्या 50 वर्षात अनेकदा मी पाहिले आहे. क्रॉस व्होटिंग होते आणि पुन्हा सरकार चालते. आघाडीत मतभेद नाही. क्रॉस व्होटिंग कधी होते? समजा मी निवडणूक लढवत आहे. माझ्याकडे मते कमी असेल तर मला मते कशी मिळतात याकडे मी लक्ष देतो. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होते. 1098मध्ये माझ्याकडे केवळ सहा उमेदवार होते. त्या आधारे आम्ही 45 मते घेऊन आमचा उमेदवार विजयी केला. हे होऊ शकते. त्यामुळे असं होऊ शकतं. उमेदवारांचा कोटा ठरला होता – काल निवडणूक होती. एनसीपीच्या दोन्ही उमेदवारांचा कोटा ठरला होता. तो कायम राहिला. एकही मत इकडचे तिकडे झाले नाही. कालच्या घटनेवरून आम्ही नाराज नाही. पण आमच्या आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्याचे दुख आहे. इतर राजकीय पक्षांचा कोटा होता. त्यांनी मत द्यायला हवे होते, ते दिले नाही. असे का झाले याची चर्चा करणार आहे.