बाबासाहेब आंबेडकर भारतातील पहिले स्त्रीवादी पुरुष होते; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे गौरवोद्गार

| Updated on: Nov 20, 2022 | 7:24 PM

ज्या काळात महिलांचा कोणताच विचार केला जात नव्हता, त्याकाळात बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या न्याय हक्कांबद्दल जोरदार चर्चा घडवून आणली होती.

बाबासाहेब आंबेडकर भारतातील पहिले स्त्रीवादी पुरुष होते; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे गौरवोद्गार
Follow us on

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरुर यांनी आपल्या ‘आंबेडकरः ए लाईफ’ या नव्या ग्रंथात संविधानाच्या शिल्पकारांना महिलांच्या हक्कांसाठी लढणारे चँपियन असं वर्णन त्यांनी आपल्या ग्रंथात केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पैलूविषयी फारशी चर्चा झाली नाही. लग्नाबाबत आंबेडकरांचे विचार (विवाहापूर्वी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असण्याच्या गरजेबद्दल सावधगिरी), गर्भधारणा, (जिथे ते जोडप्यांच्या संमतीबद्दल मत व्यक्त करतात) विचार जगभरात त्याचा संदर्भ म्हणून वापर करतात असंही शशी थरुर यांनी सांगितले.

शशी थरुर म्हणतात की, तु्म्ही महिलांच्या हक्कांबाबत, आणि त्यांच्या बाजूने बोलण्याचा विचार करता, आणि तेही 89-90 च्या वर्षापूर्वी हे सहज शक्य नाही.

कारण हे त्यांनाच शक्य आहे ज्यांनी दूरदृष्टी ठेवली आहे, आणि दूरदृष्टी ठेवली ती फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनीच. त्यामुळेच महिलांना न्याय देण्याबाबत बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विधानसभेत असताना त्यांनी महिला मजुरांच्या हक्काबद्दलही त्यांनी आपले मत व्यक्त केले होते, आणि त्यांच्या हक्कांची मागणी केली.

महिलांना अधिका सुट्ट्या देण्याचा विचार, तसेच एकाद्या महिन्यातील अडचणीच्या काळात त्यांना जादाच्या सुट्ट्या देण्याबाबतही त्यांनी आपले विचार मांडले होते. त्यांनी काळाच्या पुढे जाऊन हाही विचार केला होता की, पुरुष मजूरांप्रमाणेच महिलांनाही समान वेतन मिळावे यासाठी त्यांनी लढा दिला होता.

शशी थरुर त्याही पुढे जाऊन सांगतात की, 1938 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी एक विधेयक पास करुन घेण्यासाठी प्रयत्न केले होते. त्या विधेयकामध्ये ज्यामध्ये सरकारी निधीतून गर्भनिरोधक मोहिमेबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र ते विधेयक अनैतिकतेच्या आधारावर पास होऊ शकले नव्हते.

पण जेव्हा तुम्ही अमेरिकेतील आजची परिस्थिती आणि वैवाहिक बलात्कार कायद्याबाबत सुरु असलेल्या चर्चेच्या संदर्भात या गोष्टींकडे लक्ष द्याल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की, डॉ, बाबासाहेब आंबेडकर हे जगभरातील स्रियांसाठी त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविणारे ते भारतातील पहिले पुरुष होते असं मत शशी थरुर यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना म्हणाले की, आंबेडकर हे भारतातील पहिले पुरुष होते आणि ते स्रीवादी होते. महिलांच्या समस्यांबद्दल त्यांची समज आणि महिलांचे मांडण्यात येणारे प्रश्नांबाबत त्यांची मांडणी ही विलक्षण होती.

ज्या काळात महिलांचा कोणताच विचार केला जात नव्हता, त्याकाळात बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या न्याय हक्कांबद्दल जोरदार चर्चा घडवून आणली होती.

उच्चवर्णीय हिंदूना स्वातंत्र्य लढ्यापासून विचलित होईल असं वाटत असतानाच त्यांनी दलितांचा मुद्दा उपस्थित केला. त्याकाळी समाजात महिलांच्या हक्कांवर पुरुषांना काही फरक पडत नव्हता. त्या काळात त्यांनी महिलांचा मुद्दा उपस्थित करुन साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वार्थाने काळाच्या पुढचा विचार करणारे विचारवंत होते असं मत शशी थरुर यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी लिहिलेले आंबेडकरःअ लाइफ हे पुस्तक सध्याच्या युवकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाची ओळख करुन देण्यासाठी एक दिशादर्शक ठरणार असल्याचे मत या मांडण्यात आले आहे.