लंडन : अँनाच्या एका मित्राचा ख्रिसमस आधी डिसेंबर महिन्यात मृत्यू झाला. त्यापाठोपाठ जानेवारी 2023 मध्ये आणखी एक मैत्रीण तिने गमावली. त्या मैत्रिणीला कर्करोग झाला होता आणि तीन आठवड्यांच्या आत ती निघून गेली. त्या दोघांच्याही अंत्यसंस्काराला अँना गेली होती. मात्र, त्यानंतर ती सतत सहा महिने स्थानिक स्मशानभूमीत अनेक अंत्यसंस्कारांना हजेरी लावत होती. त्यातून तिला काही प्रश्न पडू लागले. त्याबद्दल ती तिच्या आईकडे बोलू लागली. त्यातून तिला काही गोष्टींची जाणीव झाली. आपण जिच्यावर अतोनात प्रेम करतो ती आपली आईही एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे. याच भावनेतून अँनाने आपल्या आईचे जिवंतपणीच अंतिम संस्कार केले.
आपल्या जिवंत आईचे अंत्यसंस्कार करणाऱ्या अँनाचे वय 56 वर्षे आहे. तर तिच्या आईचे 85 वर्षे आहे. स्मशानभूमीतून आलेल्या अनुभवावरुन आपली आई कायम सोबत राहणार नाही याची तिला जाणीव झाली. पण, तिला आपल्या आईबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे होते. तिच्यासोबत जे काही घडले. तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टी, दैनंदिन जीवनात घडलेल्या गोष्टी या प्रश्नांची उत्तरे तिला हवी होती.
आईसोबत बोलत असताना तिला जीवनातील नाजूकपणाची जाणीव झाली. त्यातच अँनाला ती जिवंत असताना तिच्या आईला तिचे तिच्यावर किती प्रेम आहे हे पहायचे होते. त्याची खात्री करून घेण्यासाठी तिने आईच्या अंत्यसंस्काराचे आयोजन केले. अँना आणि तिचे ६२ वर्षांचे पती मार्क फर्लिंग आणि दोन मुले हे ही यात सामील झाले.
आम्ही आमच्या कुटुंबासोबत पुरेसा वेळ घालवला नाही. त्यांनी आम्हाला नीट ओळखावे. एकमेकांचे दिवस साजरे करावे. त्यामुळे हा दिवस आईसाठी एक उत्सव होता. सेवा, वाचन, प्रार्थना असे सर्व विधी त्यात केले गेले. काही लोकांना ते ठीक वाटेल, तर काहींना नाही. अशी वेळ येईल जेव्हा येईल तेव्हा आई आमच्यासोबत नसेल. त्यावेळी आम्ही तिचे किती कौतुक केलं हे ती ऐकू शकणार नाही. त्यामुळे हा संस्कार आम्ही आधीच करून घेतला असं अँना म्हणते.
अँनाची आई मायली मिलार्ड आता 85 वर्षांची आहे. आणखी किती वेळ ती त्यांच्यासोबत असेल हे माहित नाही. पण जितका वेळ आहे तोपर्यंत तीन आनंदी ठेवायचे असा आमचा प्रयत्न आहे. खरं तर मित्राच्या अंत्यसंस्कारानंतर ही कल्पना सुचली आणि लवकरच जिवंत लोकांचे अंतिम संस्कार करण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे. याची प्रेरणा आईपासूनच मिळाली असंही अँना सांगते.