शीना बोरा हत्याकांडाला वेगळे वळण लागले आहे. शीना बोरा हत्याकांडात इंद्राणी मुखर्जी आरोपी आहेत. इंद्राणी मुखर्जी भायखळाच्या महिला कारागृहात होत्या. इंद्राणी मुखर्जी यांनी शीना बोरा हीची आपल्या ड्रायव्हरच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सरकारी वकीलांनी इंद्राणी मुखर्जी हीचे हाडे गायब झाल्याचा आरोप केला होता. परंतू सीबीआयने म्हटलेय की शीना बोरा हीची हाडे आमच्या ताब्यात असल्याचे म्हटले आहे…. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
12 वर्षांपूर्वीच्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणाची बुधवारी सुनावणी सुरु झाली आहे. यावेळी फोरेन्सिक तज्ज्ञ डॉ.झेबा खान कोर्टात उपस्थित होत्या. साल 2012 रोजी इंद्राणी मुखर्जी यांनी त्यांची मुलगी शीना बोरा हीची साथीदाराच्या मदतीने हत्या केली होती. शीना बोरा हत्याकांडाने 12 वर्षांपूर्वी खळबळ उडाली होती. या हत्याकांडात मिडिया हाऊसचे प्रमुख पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हीने आपल्याच मुलीला कारमध्ये साथीदारांच्या मदतीने गळा दाबून ठार केले होते. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करुन पेण येथील जंगलात तिच्या शरीराचे अवशेष पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रयत्न केला होता. या नंतर पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांचे संबंध बिघडले होते असे तपासात उघडकीस आले होते. या प्रकरणात गेल्या सुनावणी वेळी सरकारी वकीलांनी शीरा बोरा हीचे हाडे गायब असल्याचे म्हटले होते. ही हाडे कोर्टात सादर करावीत असे त्यांनी म्हटले होते.
शीना बोरा हीची हाडे जरी आपल्या कस्टडीत असली तरी आमचा या पुराव्यावर विश्वास नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. त्यामुळे न्यायमूर्तींनी जर तपास यंत्रणांचा जर यावर विश्वास नाही तर ही न्यायवैद्यक अहवालावर विसंबून राहण्यात काही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. सीबीआयचे वकीलांनी फोरेन्सिक तज्ज्ञ डॉ. झेबा खान यांची कोर्टात साक्ष तपासणी करावी, परंतू कोर्टाने त्यास नकार दिला आहे. तपास यंत्रणाचा जर विश्वास नसेल तर ही खटाटोप वाया जाणार असे न्यायमूर्ती नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे.
सीबीआयने आरोप केला आहे की शीना बोरा हीची साल 2012 मध्ये तिची आई इंद्राणी मुखर्जी हीने तिचा माजी पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय याने कारमध्ये गळा दाबून हत्या केली होती. यानंतर तिचा मृतदेहांचे अवशेष रायगड जिल्ह्यातील पेण गावात नेऊन जाळण्यात आले होते. इंद्राणी मुखर्जी हीचा तिसरा पती पीटर मुखर्जी याला वाचविण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न होता असा सीबीआयला संशय आहे. पोलिसांच्या आधीच्या तपासानूसार पीटर मुखर्जी निर्दोष होते.