भारतातील 6500 अब्जाधिश देश सोडण्याच्या तयारीत? हे आहे धक्कादायक कारण?

| Updated on: Jun 15, 2023 | 3:07 PM

जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, भारतासाठी ही चिंताजनक बाब ठरत आहे. भारतातील सुमारे 6500 अब्जाधीश देश सोडण्याच्या तयारीत आहेत. हा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. हा अंदाज खरा ठरला तर चीननंतर एवढ्या मोठ्या संख्येने श्रीमंत इतर देशांमध्ये स्थलांतरित होणारा भारत हा जगातील दुसरा देश ठरेल.

भारतातील 6500 अब्जाधिश देश सोडण्याच्या तयारीत? हे आहे धक्कादायक कारण?
Image Credit source: प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली : हेन्ली अँड पार्टनर्सचा वार्षिक खाजगी संपत्ती स्थलांतर अहवाल प्रसिद्ध झाला आहे. हेन्लेच्या या वार्षिक खाजगी संपत्ती स्थलांतर अहवालात ज्या व्यक्ती इतर कोणत्याही ठिकाणी किमान 10 लाख डॉलर्स किंवा 8.2 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास सक्षम आहेत अशा व्यक्तींना अति श्रीमंत श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या गुंतवणुकीत त्यांची मालमत्ता, रोख रक्कम, शेअर्स यासारख्या गोष्टींचाही समावेश आहे. याच अहवालानुसार 2023 मध्ये भारतातील सुमारे 6500 अब्जाधिश देश सोडून अन्य देशात स्थलांतर करू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेन्लेच्या अहवालात असेही म्हटले आहे की, या वर्षी भारत सोडल्यास त्या श्रीमंतांसाठी सर्वाधिक पसंतीचे देश ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती ( दुबई ), सिंगापूर, अमेरिका आणि स्वित्झर्लंड हे असू शकतात. 2023 मध्ये चीनपाठोपाठ भारत, ब्रिटन, रशिया आणि ब्राझील या पाच देशातील सर्वाधिक श्रीमंत स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत असेही अहवालात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

भारतात 3.44 लाखांहून अधिक श्रीमंत

2022 च्या अखेरीस भारत जगातील टॉप 10 श्रीमंत देशांच्या यादीत समाविष्ट झाला. या यादीत भारताचे स्थान 10 वे होते. हेन्लीच्या अहवालानुसार सध्या भारतात एकूण श्रीमंतांची संख्या 3 लाख 44 हजार 600 इतकी आहे. यापैकी सुमारे 1078 व्यक्तींची एकूण संपत्ती $100 दशलक्षपेक्षा जास्त आहे. तर, भारतातील 123 संपत्ती असे आहेत की ज्यांची संपत्ती 1 अब्ज डॉलर किंवा 8,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

भारतीय अब्जाधिश का स्थलांतर करत आहेत?

भारतातील अब्जाधिशांचे स्थलांतर करण्यामागचे कारण म्हणजे प्रतिबंधात्मक कर कायद, आउटबाउंड रेमिटन्सशी संबंधित गुंतागुंतीचे नियम, नियमांचा होणारा गैरवापर अशी विविध कारणे आहेत. श्रीमंत कुटुंबे सर्वसाधारणपणे मोबिलाइझ असतात. मात्र, भारतापेक्षा त्यांना दुबई किंवा सिंगापूर येथील अनुकूल कर वातावरण, व्यवसायाला पोषक वातावरण, सुरक्षितता, शांत वातावरण यासारख्या घटकांचे आकर्षण वाटत आहे. त्यामुळे हे श्रीमंत येथे स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत.

भारताला धोका आहे का?

हेन्ली अँड पार्टनर्सचे सीईओ ज्युर्ग स्टीफन यांच्या मते लक्षाधीशांचा वाढता प्रवाह अनेकदा एखाद्या देशामधील आत्मविश्वास कमी होण्याकडे निर्देश करतो. परिस्थिती बिघडल्यावर या व्यक्ती बाहेर पडतात. परंतु, न्यू वर्ल्ड वेल्थचे संशोधन प्रमुख अँड्र्यू अमोलिस सांगतात, भारतातून असा बाहेर पडणारा प्रवाह हा विशेषतः चिंतेचा विषय नाही. कारण, देश स्थलांतरामुळे गमावलेल्यापेक्षा कितीतरी अधिक लक्षाधीशांची निर्मिती भारत करतो.

2023 मध्ये कोणते देश सर्वाधिक करोडपती गमावतील?

रशियामधील 3,000 श्रीमंत निघून जातील, तर ब्राझील (1,200), हॉंगकॉंग (1,000), दक्षिण कोरिया (800), मेक्सिको (700), दक्षिण आफ्रिका (500) आणि जपान (300) अशी

कुठे आणि किती होईल स्थलांतर?

ऑस्ट्रेलिया (5,200 ), UAE (4,500), सिंगापूर (3,200), USA (2,100), स्वित्झर्लंड (1,800), कॅनडा (1,600), ग्रीस (1,200), फ्रान्स (1,000), पोर्तुगाल (800) हे देश अव्वल स्थानावर आहेत.