नवी दिल्लीः सिद्धू मुसेवाला हत्याकांडाला (Sidhu Musewala murder case) आता दिवसेंदिवस वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेत येत आहे. आता सिद्धू मुसेवाल हत्याकांडमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सिद्धू मुसेवाला याच्यावर गोळी झाडणाऱ्या आता दोघांना अटक (Two shooter Arrested) करण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला प्रकरणाला आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्याला वेगळे वळण लागत आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोघांनाही गुजरातमधील मुंद्रामधून (Gujarat Mundra) ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
ज्या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यामधील एकाचे नाव प्रियव्रत फौजी असून तो हरियाणाचा गँगस्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. तो फतेहाबाद पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाला होता.
या प्रकरणातील कशिश कुलदीप असे अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या शूटरचे नाव आहे. कुलदीप 24 वर्षाचा असून तोे हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील सज्यान पाना गावातील रहिवासी आहे. तो देखील फतेहगड पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही दिसत होते. 2021 मध्ये हरियाणातील झज्जर येथे झालेल्या हत्येत त्याचाही सहभाग होता असेही पोलिसांनी सांगितले.
सिद्धू मुसेवाला याची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तपासात कोणतीही कसूर सोडली नाही. आताही ज्या शूटरला ताब्यात घेतले आहे, तो शूटर अवघ्या 26 वर्षीय असून तो हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गढी सिसाना येथील रहिवासी आहे.
हरियाणातील पोलिसांच्या रिकॉर्डवर जे शूटर म्हणून जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यातील ही म्होरक्या असल्याचेही पोलिसांनी सांगितले. सिद्धू मुसेवालाची ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी फोजी थेट गोल्डी ब्रारच्या संपर्कात होता.
या अगोदरही पोलिसांनी सिद्धू मूसेवाला खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शार्प शूटर संतोष जाधवकडूनही पुणे पोलिसांना 13 शस्त्रे ताब्यात घेतली होती. यावेळी पोलिसांनी सांगितले की, गोळीबार करण्यासाठी शूटरनी मध्यप्रदेशातून शस्त्रे मागवण्यात आली होती.
त्यानंतर मुसेवालाच्या हत्येसाठी कोणते शस्त्रे वापरली होती. त्यासाठी महाराष्ट्रातील पोलिसांनी ब्लास्टिक चाचणी करणार असल्याचे सांगितले होते. याबरोबरच मुसेवालाच्या हत्येवेळी संतोष जाधव गुजरातमध्ये होता त्यावरून पोलिसांनी धागेदोरे शोधून काढले आहेत.
गुजरामधून अटक करण्यात आलेल्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून आणखी काही वेगळी माहिती मिळते का त्याचा तपास करणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.