खरगेंना मिळाले असेल मोठं पद, मात्र संघर्ष त्यापेक्षाही आहे मोठा…

| Updated on: Oct 19, 2022 | 2:50 PM

कर्नाटकच्या राजकारणात एकदाच पराभव स्वीकारावा लागणाऱ्या खरगेंना कर्नाटकातील अजिंक्य सरदार का म्हणतात, ते आजच्या निवडीनं आणखी ठळक केले आहे.

खरगेंना मिळाले असेल मोठं पद, मात्र संघर्ष त्यापेक्षाही आहे मोठा...
Follow us on

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या काँग्रेस अध्यक्ष (Congress President Election2022) पदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाला. कर्नाटकातील काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आता अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांना हा लाभ गांधी घराण्याबरोबरच्या एकनिष्ठतेमुळे मिळाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांचा राजकीय प्रवास पाहिल्यावर त्यांना हे मिळालेले पद त्या संघर्षाच्या तुलनेत मागे पडते असंही मत दिग्गज व्यक्त करत आहेत.

कर्नाटकमील राजकारणात खरगे नावाचा हा अजिंक्य सरदार गेल्या 50 वर्षांपासून सतत सक्रिय राजकारण करत आहे. अपवाद फक्त त्यांना मागील झालेल्या एका निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

त्यांच्या अजिंक्य राजकारणामुळे त्यांना सॉलिड सरदार असंही संबोधले जाते. दलित कुटुंबात जन्मलेल्या खरगे यांना सरकार आणि संघटना या दोन्हींचा प्रदीर्घ असा अनुभव आहे.

एक सामान्य कार्यकर्त्यांपासून आणि विद्यार्थी संघटनेच्याही राजकारणातही सक्रिय राहून त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली आहे. तेव्हापासूनच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली, आणि आज ते काँग्रेसारख्या देशातील सगळ्यात जुन्या पक्षाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत.

काँग्रेस अध्य७ पदाची निवडणूक जाहीर झाल्यापासून खरगे यांना राजकीयदृष्ट्या कमी लेखणे ही त्यांच्या विरोधकांची धोरणात्मक चूक होती. 1999 आणि 2004 मध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी ते प्रबळ दावेदार समजले जात होते.

त्यांच्या राजकीय आयुष्यातील हा सर्वात मोठ्या विजय समजला जात होता. मात्र कर्नाटकात तो यशस्वी झाला नाही. त्यामागे जातीच्या राजकारणाचीही अनेक कारणं होती.

1999 ते 2004 दरम्यान, कर्नाटकातील एस. एम. कृष्णा यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री असताना त्यांनी प्रख्यात चित्रपट अभिनेते राजकुमार यांची चंदन तस्कर वीरप्पनच्या तावडीतून अत्यंत शांततेच्या पद्धतीने सुटका करुन घेतली होती. हा त्यांच्या राजकीय कौशल्याचा चमत्कार आणि वेगळी बाजू होती.

कावेरी दंगल सोडवण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर बारकाईने लक्ष ठेवणारे पत्रकार रशीद यांनी मात्र पंजाब विधानसभा निवडणुकीत चन्नी यांच्यावर नावावर विसंबून राहून पक्षाचे नुकसान केल्याचे बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते. चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनवण्यात खर्गे यांचा मोठा हात होता.

काँग्रेसचे नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म 21 जुलै 1942 रोजी कर्नाटकात झाला. ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला ते ठिकाण सध्याच्या कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वरवट्टी गावात झाला होता.

ते जुन्या हैदराबाद-कर्नाटक भागात येत होते. निजामाच्या राजवटीत ते अवघ्या 7 वर्षांचे असताना जातीय दंगलीत त्यांना आई आणि कुटुंबीयांना गमवावे लागले होते.

एवढेच नाही तर दंगलीमुळे खरगे कुटुंबच सगळं संपल्यानंतर मात्र त्यांनी शेजारच्या कलबुर्गी जिल्ह्यात म्हणजेच पूर्वी गुलबर्गा म्हणून ओळखले जात होते.

जातीय दंगलीत सगळं कुटुंब सपंलं असलं तरी त्या घटनेबद्दल त्यांनी कधी कटूता ठेवली नाही म्हणूनच आजही ते जातीयवादाच्या विरोधात जोरदार आवाज उठवताना दिसून येतात.

कलबुर्गी येथे बीएचे शिक्षण घेत असताना विद्यार्थी संघटनेच्या राजकारणात सक्रिय झाले. सेठ शंकरलाल लाहोटी लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि त्यांनी केंद्रीय राजकारणात प्रवेश केला.

1969 मध्ये ते एमएसके मिल्स एम्प्लॉईज युनियनचे कायदेशीर सल्लागार बनले. आणि त्यानंतर ते लवकरच युनायटेड ट्रेड युनियनचे प्रभावी नेते म्हणून त्यांची गणना होऊ लागली.

त्या वर्षी खरगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन गुलबर्गा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले. तर 1994 मध्ये ते विधानसभेतील विरोधी पक्षनेतेही बनले.

2008 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा हे पद त्यांना बहाल करण्यात आले. त्याच वर्षी ते कर्नाटक राज्याचं त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपदही देण्यात आले.

मल्लिकार्जुन खरगे यांना 1971 मध्ये काँग्रेसकडून विधानसभेचे तिकीट मिळवण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर ते गुरुमितकल विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.

1971 पासून त्यांची सुरू झालेली विजयाची मालिका 2019 मध्ये मात्र खंडित झाली. 2008 पर्यंत ते सलग 9 वेळा कर्नाटक विधानसभेचे सदस्य होते. 2009 मध्ये ते कर्नाटकातील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. 2014 मध्ये ते पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून आले.

2009 मध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यावर ते लोकसभेतील विरोधी पक्षनेतेही बनले.

2019 मध्ये मोदी लाटेत त्यांना भाजप उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला खरा पण अर्धशतकाहून एकनिष्ठ असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांना मात्र काँग्रेस लगेच राज्यसभेवरही पाठवले.