महाराष्ट्राचा सुपुत्र देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान; राष्ट्रपतींनी दिली शपथ; कोकणातील सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यात मूळगाव

| Updated on: Aug 27, 2022 | 11:15 AM

सोलापूर, मुंबई आणि दिल्ली असा आपला कायद्याचा अभ्यास करणारे उदय लळीत यांना एप्रिल 2004 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वरिष्ठ वकील म्हणून जबाबदारी पार पाडली, तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लीगल सर्व्हिसेस कमिशनचे ते सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

महाराष्ट्राचा सुपुत्र देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान; राष्ट्रपतींनी दिली शपथ; कोकणातील सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यात मूळगाव
Follow us on

नवी दिल्लीः सरन्यायाधीश एम. व्ही. रमण्णा (M V Ramanna) आज निवृत्त होत आहेत, त्यांच्यानंतर या महत्त्चाच्या पदावर महाराष्ट्राचे सुपूत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) देशाचे नवे सरन्यायाधीश (Chief Justice) विराजमान झाले आहेत. सरन्यायाधीश पदाच जबाबदारी घेण्यापूर्वी त्यांना भारताचे राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांनी त्यांना शपथ दिला आहे. सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे उदय लळीत यांनी देशातील अनेक महत्वाचे खटले त्यांनी चालवले आहेत. टू जी स्पेक्ट्रमसारख्या मोठ्य घोटाळ्यात त्यांनी ईडीकडून अभियोगाची जबाबदारी सांभाळली होती. महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र असेलेले उदय लळीत हे कोकणाती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून देवगड तालुक्यातील गिर्ये कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव असून त्यांच्या वडीलांनी वकीलीसाठी गाव सोडून ते सोलापूरला स्थायीक झाले होते, तर उदय लळीत यांनी आपले शिक्षण आणि वकीलीची प्रॅक्टीस मुंबईतून केली आहे. उदय लळीत यांची ही तिसरी पिढी कायद्याच्या क्षेत्रात आहे.

राष्ट्रपतींनी दिली शपथ

देशाचे नव सरन्यायाधीस उदय लळीत यांना आज राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांनी शपथ दिली. एम. व्ही. रमण्णा आज सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे लळीत हे सरन्यायाधीश म्हणून आता जबाबदारी स्वीकारत आहेत. देशाच्या महत्वाच्या खटल्यांमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग राहिल्याने उदय लळीत नेहमीच चर्चेच्या केंद्रबिंदू राहिले आहेत.

महत्त्वाच्या खटल्यांमध्ये वकिलीचा ठसा

सरन्यायाधीस उदय लळीत यांनी महाराष्ट्र राज्याच्या महत्वाच्या पॅनेलवर त्यांनी सात वर्षे काम केले आहे. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा खटल्यात ईडीच्यावतीने त्यांनी अभियोगाची जबाबदारी सांभाळली होती. 80 हजार पानांचा डोलारा सांभाळत टू जी स्पेक्ट्रम केस चालवल्यानंतर उदय लळीत चर्चेत आले होत.

कोकणाती देवगडचे सुपुत्र

सरन्यायाधीश हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे सुपुत्र आहे. गिर्ये कोठारवाडी गावामध्ये त्यांचे मूळ घर असून उदय लळीत यांचे आजोबा आणि वडील हे दोघंही वकील होते. उदय लळीत यांचे आजोबा वकिलीसाठी सोलापुरला गेल्यानंतर लळीत कुटुंबीय त्याच ठिकाणी स्थायीक झाले. उदय लळीत यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झले असून 1983 मध्ये त्यांनी वकिली क्षेत्रात आपल्या कामाला सुरुवात केली, त्यानंतर 1985 च्या अखेरीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयामध्येच त्यांनी प्रॅक्टिस सुरू ठेवली होती तर जानेवारी 1986 मध्ये दिल्ली हायकोर्टात प्रॅक्टीस गेले.

एप्रिल 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील

सोलापूर, मुंबई आणि दिल्ली असा आपला कायद्याचा अभ्यास करणारे उदय लळीत यांना एप्रिल 2004 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वरिष्ठ वकील म्हणून जबाबदारी पार पाडली, तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लीगल सर्व्हिसेस कमिशनचे ते सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा खटल्यात उदय लळीत यांनी ईडीच्यावतीनं अभियोगाची जबाबदारी सांभाळलीच मात्र त्याच वेली त्यांनी 80 हजार पानांचा डोलारा सांभाळत टू जी स्पेक्ट्रम केसही चालवली होती.