Explainer : सोनिया गांधी यांना जगप्रसिद्ध मंदिरात प्रवेश नाकारला, पंतप्रधान संतापले, सीमाच केल्या बंद

| Updated on: Dec 24, 2023 | 8:40 PM

कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना जगप्रसिद्ध मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरात प्र्वर्ष देण्याची भूमिका घेतली. मात्र, यावरून पंतप्रधान नाराज झाले. ते तडक निघाले आणि त्यांनी थेट बॉर्डरवरच नाकाबंदी केली.

Explainer : सोनिया गांधी यांना जगप्रसिद्ध मंदिरात प्रवेश नाकारला, पंतप्रधान संतापले, सीमाच केल्या बंद
SONIA GANDHI AND RAJEEV GANDHI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | २३ डिसेंबर २०२३ : अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची देशभरात एकाच चर्चा सुरु आहे. देशातील अनेक मान्यवर नेते, पुजारी, शास्त्री यांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. याच दरम्यान कॉंग्रस नेत्या सोनिया गांधी या सोहळ्याला उपस्थित राहणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, यावरून 1988 मध्ये घडलेली एक घटना पुन्हा चर्चेत आली आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना डिसेंबर १९८८ ची ही घटना आहे. भारताचे शेजारी हिंदू राष्ट्र नेपाळसोबत असलेले संबंध पुन्हा घट्ट करण्यासाठी राजीव गांधी यांनी नेपाळला भेट दिली होती.

नोव्हेंबर 1987 मध्ये सार्क परिषदेत सहभागी होण्यासाठी राजीव गांधी काठमांडूला गेले होते. त्यानंतर ते पुन्हा डिसेंबर 1988 मध्ये नेपाळला गेले. यावेळी त्यांच्या पत्नी सोनिया गांधी या देखील त्यांच्यासोबत होत्या. बीर बिक्रम सिंग हे त्यावेळी नेपाळचे राजे होते. राजीव गांधी आणि बीर बिक्रम सिंग यांची चांगली मैत्री होती. राजवाड्यातील संभाषणादरम्यान राजीव गांधी यांनी बीर बिक्रम यांना कुटुंबासह जगप्रसिद्ध अशा पशुपतीनाथ मंदिरात पूजा करण्याची इच्छा व्यक्त केली.

नेपाळ हा हिंदू राजेशाही असलेला जगातील एकमेव देश होता. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर आणि पुरीच्या जगन्नाथ मंदिर यांच्याप्रमाणेच पशुपतीनाथ मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश दिला जात नाही. राजीव गांधी यांना याची माहिती मिळाली होती. यासाठी त्यांनी नेपाळच्या राजासमोर हा प्रश्न उपस्थित केला. पण, राजा बीर बिक्रम सिंग हे भारताच्या पंतप्रधानांना मदत करू शकले नाहीत.

भारताचे पंतप्रधान यांनी नेपाळच्या राजाची मध्यस्ती घेण्याचे कारण म्हणजे ‘राजीव गांधी यांचे स्वागत आहे, परंतु, सोनिया गांधी या हिंदू नसल्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे मंदिर व्यवस्थापनाने भारतीय दूतावासाला सांगितले होते. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. त्यामुळेच राजीव गांधी सोनिया गांधी यांच्या मंदिरात सुरक्षित प्रवेशाबाबत नेपाळच्या राजाकडून आश्वासन मागत होते. पण, राजा बिरेंद्र यांनी पुरोहितांना तसे कोणतेही आदेश देण्यास असमर्थता व्यक्त केली.

नेपाळचे राजा बीर बिक्रम सिंग यांची पत्नी आणि तत्कालीन नेपाळच्या राणी ऐश्वर्या यांचा पशुपतीनाथ मंदिराच्या ट्रस्टमध्ये बराच हस्तक्षेप होता. ख्रिश्चन वंशाच्या सोनिया गांधी यांनी पशुपतीनाथ मंदिरात पाऊल ठेवावं असं त्यांना वाटत नव्हतं. त्यांनीही याप्रकरणी कडक भूमिका घेतली होती. राजीव गांधी यांनी ही घटना वैयक्तिक अपमान म्हणून घेतली. पशुपतीनाथ मंदिरातून दर्शन आणि पूजा न करताच ते भारतात परतले.

राजीव गांधी यांची ही नेपाळ भेट दोन्ही देशामधील संबध सुधारण्यासाठी महत्वाची मानली जात होती. पण, झालेल्या अपमानाने राजीव गांधी संतापले होते. काही काळानंतर त्यांनी भारत – नेपाळ सीमेवर नाकाबंदी केली. यामागे नेपाळने भारताचा शत्रू राष्ट्र चीनकडून विमानविरोधी तोफा आणि इतर शस्त्रे खरेदी केली असे कारण सांगितले गेले. परंतु, या निर्णयामागे सोनिया गांधींना मंदिरात प्रवेश न देण्याचा मुद्दा हे खरे कारण होते असे मानले जाते.

राजीव गांधी यांनी केलेल्या नाकेबंदीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ठप्प झाला. संबंध खूपच ताणले गेले होते. RAW चे माजी विशेष संचालक अमर भूषण यांनी ‘इनसाइड नेपाळ’ या पुस्तकामध्ये राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत नेपाळची राजेशाही उलथून टाकण्यासाठी कसे काम केले होते हे सांगताना ही घटना विषद केली आहे.