नवी दिल्ली | 12 फेब्रुवारी 2024 : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेत्या यंदा लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत असे म्हटले जात आहे. त्या ऐवजी सोनिया गांधी यांना राजस्थानातून राज्यसभेवर पाठविण्याची तयारी सुरु असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सध्या सोनिया गांधी या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या लोकसभा खासदार आहेत. सोनिया गांधी यांच्यासोबत अभिषेक मनू सिंघवी देखील राज्यसभेचे उमेदवार होऊ शकतात. या शिवाय कॉंग्रेसच्या अन्य काही नेत्यांना राज्यसभेत पाठविण्यात येऊ शकते. त्यात अजय माकन आणि अखिलेश प्रसाद सिंह यांचा देखील समावेश आहे. कॉंग्रेस पक्ष राज्यसभेची आपल्या उमेदवारांची यादी येत्या एक ते दोन दिवसात जाहीर करु शकतो असे म्हटले जात आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसच्या युतीची घोषणा एका आठवड्याच्या आत होऊ शकते असे म्हटले जात आहे. या युतीतून कॉंग्रेसला 15 ते 16 जागा मिळू शकतात. यात कॉंग्रेसला अमेठी आणि रायबरेलीची जागा कॉंग्रेसच्या जवळच राहील असे म्हटले जात आहे. तसेच जेडीयूच्या वतीने संजय झा यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. संजय झा आणि अखिलेश सिंह यांनी आज विधानसभेतून आवश्यक कागदपत्रे घेतली आहेत.
भाजपाने याआधीच भीम सिंह आणि धर्मशिला गुप्ता यांना राज्यसभेचे उमेदवार घोषीत केले आहे. आता आरजेडी पक्षाच्यावतीने राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी 15 राज्यातील 56 जागांवर राज्यसभेच्या निवडणूका होणार आहेत. राज्यसभेच्या जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी आहे.
सोनिया गांधी यांना राजस्थानातून राज्यसभेवर पाठविण्याची योजना आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या उत्तरप्रदेशातील रायबरेलीतील लोकसभा जागेवरुन कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना निवडणूकीसाठी उतरविण्याची तयारी कॉंग्रेस करीत आहे. राजस्थानातील तीन जागांवर राज्यसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यात भाजपाच्या वाट्याला 2 आणि कॉंग्रेसच्या वाट्याला एक सीट येण्याची शक्यता आहे.
विविध राज्यातील राज्यसभेच्या जागांवर निवडणूका होणार आहेत. यात कॉंग्रेसला 10 जागांवर विजय मिळू शकतो. कॉंग्रेसला तेलंगणातून 2, कर्नाटकातून 3, राजस्थान, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि बिहार येथूनही एक सीट मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या 56 जागांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून 27 फेब्रुवारीला गरज पडली तर निवडूका होतील असे म्हटले जात आहे.