नवी दिल्ली : वाढत्या औद्योगिकरणासोबत आणि कथित विकासाच्या प्रकल्पांमध्ये निसर्गासह जैवविविधताच धोक्यात येत चाललीय. हा प्रश्न केवळ एकट्या भारताचा नसून जगभरात कमी अधिक फरकाने अशीच स्थिती आहे. मात्र, अनेक ठिकाणी हीच जैवविविधता जपण्यावरही भर दिला जात आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशमधील वन विभाग. आपल्या जैवविविधतेसाठी विशेष नियोजन आणि त्याच्या अचूक अंमलबजावणीमुळे मध्य प्रदेशला वाघ आणि बिबट्यांनतर आता गिधाड आणि मगरींचंही घर म्हणून ओळख मिळणार आहे, असा दावा मध्य प्रदेशच्या वन मंत्र्यांनी केलाय (Special Story on Madhya Pradesh state of Crocodiles and Vulture).
याधीच मध्य प्रदेशला वाघांचं राज्य म्हणून सन्मान मिळालाय. नुकताच वाढत्या बिबट्यांच्या संख्येने मध्य प्रदेशला बिबट्यांचं राज्य असल्याचाही मान मिळवून दिला. आता वाघ आणि बिबट्यांनंतर मध्य प्रदेश गिधाड आणि मगरींचंही राज्य होईल. मध्य प्रदेश गिधाड आणि मगरींच्या संख्येतही देशात पहिल्या क्रमांकावर असेल, असा दावा मध्य प्रदेशचे वन मंत्री विजय शाह यांनी केलाय.
मध्य प्रदेशला आधीच वन्यजीव व्यवस्थापनात 3 पुरस्कार मिळालेले आहेत. तेथील 3 प्राणीसंग्रहालयं वाघांच्या संवर्धनासाठी निवडण्यात आलेत. आता सरकार आणखी काही भागात जंगल विकसित करुन तेथे प्राणी संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहे. लवकरच केंद्र सरकारकडून राज्यनिहाय कोणत्या राज्यात प्राण्यांची संख्या किती आहे यावर अहवाल प्रकाशित होईल. यानंतरच कोणतं राज्य बाजी मारतं हे स्पष्ट होणार आहे.
मध्य प्रदेशात 8397 गिधाडं
मध्य प्रदेशमध्ये 2019 च्या गणनेनुसार 8 हजार 397 गिधाडं आहेत. ही संख्या भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मध्य प्रदेशात गिधाडांची संख्या इतकी असण्यामागील एक कारण हेही आहे की 2013 मध्ये मध्य प्रदेशातील भोपाळ येथे गिधाड संरक्षण आणि प्रजनन केंद्र निर्माण करण्यात आलंय.
मगरींचं मध्य प्रदेश राज्य
मध्य प्रदेशात सर्वाधिक जास्त मगरी चंबळ नदीच्या खोऱ्यात आहेत. येथील आकड्यांची तुलना इतर राज्यांशी केल्यानंतर येथे सर्वाधिक मगरी असल्याचं समोर आलंय. एकट्या चंबळ नदीत 1255 मगरी आहेत. वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अहवालात हा दावा करण्यात आलाय. 40 वर्षांपूर्वी मगरीची प्रजाती अगदी लुप्त होण्याच्या मार्गावर होती. तेव्हा जगभरात केवळ 200 मगरीच शिल्लक होत्या. यापैकी संपूर्ण भारतात 96 आणि त्यातील 46 चंबळ नदीत होत्या.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील जंगलांमध्ये 122 वाघांची वाढ, व्याघ्र संवर्धन प्रकल्पाचे यश
पुण्यात आणखी एक गवा, पण येतायत कुठून?
16 तास विहिरीत तगमग, हत्ती अखेर बाहेर
व्हिडीओ पाहा :
Special Story on Madhya Pradesh state of Crocodiles and Vulture