Gaganyaan Mission : भारत चंद्रावर मानव कधी पाठवणार?; गगनयानची पहिली चाचणी यशस्वी झाल्यानंतर हे तीन टप्पे महत्वाचे

| Updated on: Oct 21, 2023 | 12:02 PM

Gaganyaan Mission 2023 : Gaganyaan Mission : मिशन गगनयानमधील दोन भाग अत्यंत महत्वाचे; अवकाश संशोधनात भारत महत्वाची भूमिका बजावतोय. अशात लवकरत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिलं पाऊल ठेवतील. भारत चंद्रावर मानव कधी पाठवणार?; गगनयानची पहिली चाचणी यशस्वी, आता हे तीन टप्पे महत्वाचे...

Gaganyaan Mission : भारत चंद्रावर मानव कधी पाठवणार?; गगनयानची पहिली चाचणी यशस्वी झाल्यानंतर हे तीन टप्पे महत्वाचे
Follow us on

श्रीहरीकोटा | 21 ऑक्टोबर 2023 : चांद्रयान 3 च्या यशानंतर अवकाश संशोधन क्षेत्रात भारत आणखी एक पाऊल पुढे टाकतो आहे. आता भारत चंद्रावर मानवाला पाठवण्याची तयारी करत आहे. या मोहिमेतला महत्वाचा टप्पा आज पार पडला. गगनयान मोहिमेतील पहिला टप्पा आज यशस्वी झाला. गगनयानचं आज यशस्वी लँडिंग झालं. श्रीहरीकोटा इथून यानाने उड्डाण घेतलं. बंगालच्या खाडीमध्ये यशस्वी लँडिंग झालं. भारत गगनयान मिशन 2025 ची तयारी करत आहे. त्यातलाच पहिला अत्यंत महत्वाचा टप्पा आज पूर्ण झाला. भारत लवकरच मानवरहित यान चंद्रावर पाठवणार आहे. त्यासाठीची तयारी सध्या सुरु आहे.

2025 हे वर्ष भारतीय अंतराळ मोहिमेसाठी महत्वाचं वर्ष आहे. या वर्षात भारत मानवरहित यान अवकाशात पाठवणार आहे. 3 अंतराळवीरांसह यान अवकाशात झेपावणार आहे. या मोहिमेआधी चार चाचण्या केल्या जातील. अंतराळात भारताचं हे पहिलं मानवी उड्डाण असेल. 2035 पर्यंत भारत अंतराळात स्पेस स्टेशन तयार करण्याच्या तयारीत आहे.

अंतराळ संशोधनात भारताचा वाटा मोठा आहे. चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला. त्यानंतर आता भारत चंद्रावर मानवाला पाठवणार आहे. 2040 हे वर्ष भारतासाठी महत्वाचं असेल. या वर्षी भारत मानरहित यान चंद्रावर पाठवणार आहे.

क्रू मॉड्यूल, सर्व्हिस मॉड्यूल म्हणजे काय?

गगनयानमध्ये क्रू मॉड्यूल हा महत्वाचा भाग आहे. याचं वजन 3 हजार 725 किलो आहे. क्रू मॉड्यूलमध्ये मानवाला राहता येईल, असं वातावरण आहे. पृथ्वीसारखं या क्रू मॉड्यूलमध्ये राहण्यायोग्य वातावरण आहे. या मॉड्यूलमधून भारतीय अंतराळवीर अवकाशात झेपावतील. क्रू मॉड्यूल इतकाच सर्व्हिस मॉड्यूल देखील या गगन यान मोहिमेतील महत्वाचा टप्पा आहे. क्रू मॉड्यूल चालवण्यासाठीचं इंधन सर्व्हिस मॉड्यूलमध्ये ठेवलं जातं. अंतराळात उड्डाण केल्यावर काही अंतरावर सर्व्हिस मॉड्यूल क्रू मॉड्यूलपासून वेगळं होईल.सर्व्हिस मॉड्यूलचे वजन 2 हजार 900 किलो इतकं आहे.