लोकसभा निवडणूकाचे बिगुल वाजले आहे. देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणूकांची 16 मार्च रोजी घोषणा करण्यात आली आहे. देशात 19 एप्रिल ते 1 जून अशा 44 दिवसांच्या प्रदीर्घ काळात एकूण सात टप्प्यात निवडणूका होणार आहेत. महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत पाच टप्प्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. आणि 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी 7 जागांवर आणि पश्चिम बंगालच्या 42 लोकसभा जागांपैकी 3 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूरची जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान आहे. भाजपाने या लोकसभा निवडणूकांसाठी स्टार कॅंपेनरची भलीमोठी यादी निवडणूक आयोगाला पाठविली आहे. त्यात तब्बल 40 स्टार कॅंपेनरची यादीच देण्यात आली आहे. यात एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले, नारायण राणे, अशोक चव्हाण भाजपचे स्टार कॅंपेनर असल्याचे म्हटले आहे.
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हटल्या जाणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा 2024 च्या निवडणूकांची घोषणा नुकतीच करण्यात आली. या निवडणूका 19 एप्रिल ते 1 जून अशा एकूण सात टप्प्यांमध्ये होणार आहेत. या निवडणूकांची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. या निवडणूकांसाठी महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांवर निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांसाठी भाजपाने अब की बार 400 पारचा नारा दिला आहे. या निवडणूकांसाठी भाजपाने आपल्या स्टार कॅंपेनरची यादी निवडणूक आयोगाला पाठविली आहे, या यादीत स्टार कॅंपेनर म्हणून एकूण 40 जणांची नावे समाविष्ट केली आहेत. यात निवडणूक प्रचार करण्यासाठी निवडलेल्या नेत्यांमध्ये भाजपात दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांनाही मोठे स्थान देण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण आणि नारायण राणे या स्टार कॅंपेनरचा दर्जा देण्यात आला आहे.
स्टार कॅंपेनरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांची नावे आहेत. महाराष्ट्रात भाजपात आयात केलेले एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील आणि नारायण राणे यांना यादीत मानाचे स्थान दिले आहे.
या यादीत भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, आशीष शेलार,पंकजा मुंडे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, पीयुष गोयल, रावसाहेब दानवे पाटील या महाराष्ट्रातील भाजपाच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तर अनुराग ठाकूर, ज्योर्तिरादित्य सिंधीया, स्मृती ईराणी, भजनलाल शर्मा, योगी आदित्यनाथ, भुपेंद्र भाई पटेल, विष्णुदेव सहाय, मोहन यादव, प्रमोद सावंत अन्य राज्यातील मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची देखील नावे आहे.
BJP star campaigner List –