Corona Help Line Numbers | कोरोना काळात मदतीची आवश्यकता? पाहा भारतातील हेल्पलाईन क्रमांकाची राज्य-वार यादी

| Updated on: Apr 16, 2021 | 12:41 PM

लोकांना या आजाराबाबत काही शंका असतील आणि त्यांना काही गरज भासल्यास संबंधित रुग्णालयांमध्ये जाण्यापूर्वी त्यांना बेड आणि व्हेंटीलिटरची उपलब्धता जाणून घेण्यासाठी, मदत मिळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक राज्यात हेल्पलाईन क्रमांक निश्चित केले आहेत.

Corona Help Line Numbers | कोरोना काळात मदतीची आवश्यकता? पाहा भारतातील हेल्पलाईन क्रमांकाची राज्य-वार यादी
भारतात कोरोनाच्या नव्या विषाणूने शिरकाव केलाय. हा विषाणू ट्रिप म्युटंट असल्याचं समोर आलंय. त्याचाच परिणाम म्हणून देशभरात कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या नव्या कोरोना विषाणूचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसलाय. महाराष्ट्रात नुकत्याच गेलेल्या जीनोम सिक्वेंसिंगमधून या नव्या विषाणूची आकडेवारी समजलीय. यानुसार नव्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये 60 टक्के रुग्ण या नव्या कोरोना विषाणूमुळे बाधित झाले आहेत.
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूची ही दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिक तीव्र असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी (15 एप्रिल) भारतामध्ये 2,17,353 नवीन केसेस नोंदवल्या गेल्या, तर, 1185 मृत्यूंची नोंद झाली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 1,42,91,917 वर पोहोचली आहे. तर, देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 1,74,308 लोकांनी आपला जीव गमावला आहे (State vise Corona Help Line Numbers by central government).

सध्या एकूण 15,69,743 इतके सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आणि केरळ या पाच राज्यांत एकूण रूग्णांपैकी 67.16 % रुग्ण आहेत.

लोकांना या आजाराबाबत काही शंका असतील आणि त्यांना काही गरज भासल्यास संबंधित रुग्णालयांमध्ये जाण्यापूर्वी त्यांना बेड आणि व्हेंटीलिटरची उपलब्धता जाणून घेण्यासाठी, मदत मिळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक राज्यात हेल्पलाईन क्रमांक निश्चित केले आहेत. पाहा राज्य-वार यादी…

(State vise Corona Help Line Numbers by central government)

पाहा राज्यवार यादी :

क्रमांक राज्य हेल्पलाईन नंबर
1 आंध्रप्रदेश 0866-2410978
2 अरुणाचल प्रदेश 9436055743
3 आसाम 6913347770
4 बिहार 104
5 छत्तीसगड 104
6 गोवा 104
7 गुजरात 104
8 हरियाणा 8558893911
9 हिमाचल प्रदेश 104
10 झारखंड 104
11 कर्नाटक 104
12 केरळ 0471-2552056
13 मध्यप्रदेश 104
14 महाराष्ट्र 020-26127394
15 मनिपूर 3852411668
16 मेघालय 108
17 मिझारोम 102
18 नागालँड 7005539653
19 ओडिशा 9439994859
20 पंजाब 104
21 राजस्थान 0141-2225624
22 सिक्कीम 104
23 तमिळनाडू 044-29510500
24 तेलंगाणा 104
25 त्रिपुरा 0381-2315879
26 उत्तराखंड 104
27 उत्तरप्रदेश 18001805145
28 पश्चिम बंगाल 1800313444222, 03323412600

 

क्रमांक संयुक्त प्रदेश हेल्पलाईन नंबर.
1 अंदमान आणि निकोबार 03192-232102
2 चंदीगड 9779558282
3 दादरा, नगर हवेली, दीव दमण 104
4 नवी दिल्ली 011-22307145
5 जम्मू-काश्मीर 01912520982, 0194-2440283
6 लडाख 1982256462
7 लक्षद्वीप 104
8 पुद्दूचेरी 104

(State vise Corona Help Line Numbers by central government)

राज्यातही कोरोनाचा हाहाकार!

राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. आज कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येसह मृत्यूचं तांडव पाहायला मिळत आहे. राज्यात काल (15एप्रिल) दिवसभरात तब्बल 349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 61 हजार 695 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 53 हजार 335 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 20 हजार 60 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

आजच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 36 लाख 39 हजार 855 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 29 लाख 59 हजार 56 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मृत्यांचा आकडा 59 हजार 153 वर जाऊन पोहोचला आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती

मुंबईत काल (15 एप्रिल) दिवसभरात 8 हजार 217 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 10 हजार 97 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील मृतांची संख्याही चिंताजनक बनली आहे. दिवसभरात मुंबईत 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 85 हजार 494 सक्रिय रुग्ण आहेत. आजच्या आकडेवारीनुसार मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 82 टक्क्यांवर पोहोचलाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 42 दिवसांवर येऊन ठेपला आहे. 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान मुंबई जिल्ह्यातील कोविड वाढीचा दर 1.64 टक्क्यांवर आला आहे.

(State vise Corona Help Line Numbers by central government)

संबंधित बातम्या : 

जामखेडच्या रुग्णालयातील उपचारपद्धती कोरोनावर फायदेशीर? विचार व्हावा, रोहित पवारांचं आवाहन

Maharashtra Sanchar Bandi : आता सर्वसामान्यांचं पेट्रोल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली