Narendra Modi : बंगालच्या खाडीत वादळ धडकणार; पंतप्रधान मोदी यांचं आवाहन काय?

| Updated on: Dec 03, 2023 | 9:41 PM

भाजपच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. यावेळी मोदींनी पक्षापेक्षा देश मोठा असं म्हणत तेलंगणा आणि ओरिसामधील भाजप कार्यकर्त्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. मोदींनी मदतीचं आवाहन काय केलं आहे ते जाणून घ्या.

Narendra Modi : बंगालच्या खाडीत वादळ धडकणार; पंतप्रधान मोदी यांचं आवाहन काय?
Follow us on

नवी दिल्ली : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपने बाजी मारली आहे. काँग्रेसने बीआरएसला धक्का देत तेलंगणामध्ये सत्तेत आली. भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान राज्यांमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. या विजयानंतर भाजपच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. यावेळी मोदींनी पक्षापेक्षा देश मोठा असं म्हणत तेलंगणा आणि ओरिसामधील भाजप कार्यकर्त्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. मोदींनी असं आवाहन केलं ते जाणून घ्या.

…म्हणून मोदींनी कार्यकर्त्यांना आवाहन

मी संघटनेतून आलेलो आहे. मी संपूर्ण दिवस टीव्हीवर काय चाललं आहे. ते पाहू शकलो नाही. पूर्वेकडे वादळाची शक्यता होती. त्यामुळे मी तिकडे बिझी होतो. आपल्याला वादळापासून सावध राहायचं आहे. बंगालच्या खाडी परिसरात त्याचा प्रभाव पडू शकतो. केंद्र सरकार राज्य सरकारच्या संपर्कात आहे. तामिळनाडू, ओरिसा आंध्रप्रदेश आणि पाँडेचरीच्या कार्यकर्त्यांना सांगतो, कुणाचंही सरकार असो तुम्ही मदत कार्याच्या कामाला लागा. प्रशासनाला सहकार्य करा. आपल्यासाठी पक्षापेक्षा देश आहे. आपल्या हृदयपेक्षा मोठे देशवासी असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी वाढली आहे. कारण नकारात्मक शक्ती वाढणार आहे. एकत्र येतील. समाजात दरी निर्माण करणारे नवी संधी शोधतील. आपल्याला त्यांची सामना करायचा आहे. त्यांच्या फेक नरेटिव्हला उत्तर द्यायचं आहे. आपल्याला जनतेचा विश्वास वाढवायचा असल्याचं मोदी म्हणाले.

दरम्यान, जिंकण्यासाठी हवेतल्या गप्पा मारणं आणि लोकांना लालच दाखवणं हे मतदार स्वीकारत नाही. मतदारांना त्यांचं जीवन चांगलं करण्यासाठी एक स्पष्ट रोडमॅप हवा असतो. विश्वास हवा असतो. भारताचा मतदार हे जाणून आहे. भारत पुढे जातो तेव्हा राज्य पुढे जातं. प्रत्येक कुटुंबाचं जीवनमान उंचावतं. त्यामुळेच तो भाजपला वारंवार निवडून देत आहेत, असं मोदींनी म्हटलं आहे.