नवी दिल्ली : गुगलमध्ये कित्तेक भारतीय महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत. त्यापैकी एक आहेत केरळमध्ये जन्म झालेले थॉमस कुरियन. २०१८ मध्ये त्यांनी गुगल क्लाऊडच्या सीईओची जबाबदारी घेतली. आता थॉमस कुरियन हे भारतातील दुसरे श्रीमंत सीईओ आहेत. थॉमस हे आयआयटी ड्रापआऊट आहेत. हुरन इंडियाच्या यादीनुसार, २०२२ मध्ये थॉमस कुरियन यांची संपत्ती १२ हजार १०० कोटी रुपये होती. गुगलच्या विद्यमान सीईओंची संपत्ती ५ हजार ३०० कोटी होती. याचा अर्थ थॉमस कुरियन यांची संपत्ती सुंदर पिचाई यांच्यापेक्षा दुप्पट आहे.
थॉमस यांचे वडील केमिकल इंजीनीअर होते. थॉमस यांनी सेंट जोसेफ बॉईज हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांचे भाऊ जॉर्ज कुरियन आहेत की, जे २०१५ पासून नेटअॅपचे सीइओ म्हणून काम करत आहेत. दोघेही भाऊ लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. दोन्ही भाऊ आयआयटी मद्रासला गेले. पण, थॉमस कुरियन यांनी आयआयटी मद्रास सोडण्याचा निर्णय घेतला.
थॉमस यांचा प्रवेश अमेरिकेच्या प्रिंसटन विद्यापीठात झाला. १६ व्या वर्षी थॉमस हे पदवीसाठी अमेरिकेला पोहचले. इलेक्ट्रीकल इंजीनीअरिंगमध्ये त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर थॉमस यांनी स्कूल ऑफ बिझनेसमध्ये एमबीए केलं.
थॉमस यांना पहिली नोकरी मॅकिन्से कंपनीत मिळाली. तिथं सहा वर्षे काम केल्यानंतर १९९६ मध्ये ओरेकलला गेले. त्यांनी २२ वर्षे पर्यंत काम केलं. त्यानंतर त्यांनी लीडरशीपमध्ये प्रवेश केला. ओरेकलमध्ये ३२ देशांच्या ३५ हजार लोकांच्या टीमला लीड केले. २०१८ मध्ये त्यांचे ओरेकल कंपनीचे संस्थापक लॅरी एलीसनसोबत मतभेद झाले. कंपनीचा राजीनामा देऊन त्यांनी गुगल जॉईन केले.
हुरन इंडियाच्या लिस्टनुसार, २०२२ मध्ये सर्वात श्रीमंत भारतीय सीइओंच्या लिस्टमध्ये अरिस्टा नेटवर्क्सच्या जयश्री उल्लाल होत्या. त्या थॉमस कुरियनपेक्षा श्रीमंत होत्या. थॉमस कुरियन कुटुंबीय खूप श्रीमंत आहेत. त्यांचे वडीलही श्रीमंत आहेत.