जीवनात ही चूक कधी करू नका, सुधा मूर्ती एका अंध पुजाऱ्यास 20 हजार रुपये द्यायला गेल्या,पण त्याने असे काही सांगितले की..

| Updated on: Aug 25, 2024 | 5:03 PM

सुधा मूर्ती त्यांच्या साध्या राहणीबद्दल आणि उच्च विचारांबद्दल तरुण पिढीच्या प्रेरणास्थान बनल्या आहेत.

जीवनात ही चूक कधी करू नका, सुधा मूर्ती एका अंध पुजाऱ्यास 20 हजार रुपये द्यायला गेल्या,पण त्याने असे काही सांगितले की..
sudha murti
Follow us on

जगातील सर्वात मोठी आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या आणि टाटा कंपनीतील पहिल्या महिला इंजिनिअर आणि लेखिका खासदार सुधा मूर्ती यांचा परिचय देण्याची गरज नाही, त्या नेहमीच आपल्या जीवनातील अनुभव शेअर करीत असतात. यावेळी त्यांनी एका अंध पुजाऱ्याबद्दलचा आलेला आपला अनुभव किस्सा सांगितला आहे. तो मोठा प्रेरक आहे जीवनाचे सारच यात आले आहे.

सुधा मूर्ती एकदा तामिळनाडू येथे एका कार्यक्रमानिमित्त गेल्या होत्या. लांबचा प्रवास होता. वाटेत त्यांची कार अचानक बंद पडली. ड्रायव्हरने सांगितले की जवळच एक मंदिर आहे. तेथे तुम्ही आराम करु शकता. तोपर्यंत गाडी दुरुस्त होईल असा सल्ला त्यांना मिळाला. त्यावेळी त्यांना गाडीतून उतरण्याची मूळीच इच्छा नव्हती. परंतू अखेर मजबूरीने त्या मंदिरात गेल्या. तेथील पुजारी अंध होता. त्या अंध पुजाऱ्याला आणि त्याच्या पत्नीला सुधा मूर्ती कोण वगैरे काही माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. मंदिरात जाताच त्या अंध पुजारी आणि त्याच्या पत्नीने त्यांचे स्वागत केले. आणि पाणी प्यायला दिले आणि त्यांना आराम करा म्हणाला. त्यावेळी जाताना ड्रायव्हरला त्यांनी त्या पुजाऱ्याला शंभर रुपये देण्यासाठी दिले. त्यावेळी त्या पुजाऱ्याने हे खूप जास्त पैसे आहेत आपण ते स्विकारु शकत नसल्याचे सांगितले.

पुजाऱ्याच्या उत्तराने त्या खूप प्रभावित झाल्या आणि त्यांनी त्याला मदत करण्याच्या इच्छेने पुजाऱ्याची नावासह सर्व सविस्तर माहिती मागितली. त्यांना त्यांच्या म्हातारपणाच्या मदतीसाठी त्यांनी  20 हजार रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासही पुजाऱ्याने नम्रपणे नकार दिला आणि म्हणाला की मी तुम्हाला ओळखत नाही. परंतू तु्म्हाला एक सांगू इच्छतो  की जीवनात ही चूक कधी करु नका…

‘जे आहे त्यात समाधानी आहे’

अंध पुजाऱ्याने पैसे घेण्यास नकार दिल्याने त्या म्हणाल्या की आपण असे का म्हणत आहात. यावर पुजाऱ्याने तुम्ही मला पैसे दिले तर माझ्यासाठी तो मोठा बोजा असेल. आता गावकरी माझी देखभाल करीत आहेत. परंतू जेव्हा त्यांना कळेल की माझ्याजवळ बँकेत वीस हजार रुपये आहेत तेव्हा ते पैसे मिळण्याच्या लालसेने माझी सेवा करतील. देवाने मला जे दिले आहे. त्यात मी समाधानी आहे. सूधा मूर्ती या पुजाऱ्याच्या बोलण्याने प्रभावित झाल्या. पुजारी अंधत्व आणि वार्धक्याने थकले असले.. कफल्लक असले तरी मनाने किती श्रीमंत आहेत. त्यांना कळलंय की खरी श्रीमंती पैशात नाही तर आपल्या समाधानात आहे. आपल्याकडे जे आहे त्यात ते समाधानी आहेत.