परीक्षेच्या ओळखपत्रावर चक्क सनी लियोनीचा फोटो, नेमका काय आहे हा प्रकार?

| Updated on: Feb 20, 2024 | 1:07 PM

उत्तर प्रदेश पोलीस भरतीच्या परीक्षेला चक्क सनी लियोनी (sunny leone Admission Card) बसल्याची चर्चा सोसल मिडीयावर रंगत आहे. त्यामागचे कारणही खासच आहे.

परीक्षेच्या ओळखपत्रावर चक्क सनी लियोनीचा फोटो, नेमका काय आहे हा प्रकार?
सनी लियोनीचे हेच ते ओळखपत्र
Image Credit source: Social Media
Follow us on

महोबा : सरकारी नोकरी कोणाला नको असते. सरकारी नोकर भर्तीच्या जाहिराती निघाल्या ही त्याच्या परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये असते. मात्र सध्या उत्तर प्रदेश पोलीस भरतीच्या परीक्षेला चक्क सनी लियोनी (sunny leone Admission Card) बसल्याची चर्चा सोसल मिडीयावर रंगत आहे. त्यामागचे कारणही खासच आहे. उत्तर प्रदेश पोलिस भर्तीमध्ये एका व्यक्तीच्या परिक्षेच्या ओळखपत्रावर चक्क सनी लिओनीचा फोटो छापण्यात आला. काल हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस चौकशीसाठी उमेदवाराच्या घरी पोहोचले.

नेमका प्रकार काय?

धर्मेंद्र कुमार असे प्रवेशपत्र असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील रगौलिया बुजुर्ग गावचा रहिवासी आहे. रविवारी, 18 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे पथक चौकशीसाठी त्याच्या गावी पोहोचले. चौकशीदरम्यान धर्मेंद्र कुमारने सांगितले की, त्याने महोबा येथील कॉम्प्युटर कॅफेमधून पोलिस भरतीसाठी अर्ज केला होता. ज्यामध्ये परीक्षा केंद्र कन्नौजमध्ये आले. सनी लिओनीच्या फोटोबाबत त्याने सांगितले की, हे कसे घडले हे मला माहीत नाही. तो म्हणतो की, जेव्हा त्याला प्रवेशपत्र मिळाले तेव्हा त्यावर त्याचा फोटो छापण्यात आला होता. पण नंतर हा फोटो कसा बदलला हे कळले नाही.

या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तपासानंतर काय घडले हे स्पष्ट होईल. या प्रकरणाबाबत एएसपी सत्यम म्हणाले की, कोणीतरी चुकीच्या नावाने अर्ज केला होता.

हे सुद्धा वाचा

खोडसाळपणामुळे तरूणाला त्रास

धर्मेंद्र कुमार पोलीस भरती परीक्षा देण्यासाठी कन्नौजच्या परीक्षा केंद्रावर आले होते. यावेळी त्याच्याकडे असलेल्या प्रवेशपत्रावर धर्मेंद्रच्या ऐवजी सनी लिओनीचा फोटो होता. त्यामुळे धर्मेंद्र यांना परीक्षेला बसू दिले नाही. तसेच धर्मेंद्र यांच्या प्रवेशपत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे लोकांनी ॲडमिट कार्डची खणखणीत सुरुवात केली. अनेक मीम्स पेजवरही ते शेअर करण्यात आले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी यामागे सोल्व्हर टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. नोकरीसाठीची परिक्षा हा अनेकांसाठी जीवनातील महत्वाचा टप्पा असतो. अशावेळा एखाद्याचा खोडसाळपणा कुणाच्यातरी जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकणारा ठरू शकतो.