Rajnikant | सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात नो एन्ट्री! काय आहे कारण?

| Updated on: Dec 29, 2020 | 1:05 PM

सुपरस्टार रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं आहे.

Rajnikant | सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात नो एन्ट्री! काय आहे कारण?
Follow us on

नवी दिल्ली: सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाकडे त्याचे देशभरातील कोट्यवधी चाहते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. पण तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच आपण राजकारणात एन्ट्री करणार नसल्याची घोषणा रजनीकांत यांनी केली आहे. तसंच कोणत्याही राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं रजनीकांत यांनी जाहीर केलं आहे. ANIकडून तशी माहिती देण्यात आली आहे. (Superstar Rajinikant will not enter politics)

‘राजकारणात प्रवेश नाही पण लोकांसाठी काम सुरुच’

सुपरस्टार रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं आहे. असं असलं तरी रजनीकांत यांनी अजून एक महत्वाची घोषणा केलीय. आपण राजकारणातप्रवेश करणार नसलो तरी लोकांसाठी काम करत राहणार असल्याचं ते म्हणाले.

31 डिसेंबरला करणार होते पक्षाची घोषणा

रजनीकांत यांनी यापूर्वी घोषणा केली होती की, 31 डिसेंबरला आपण नव्या पक्षाची घोषणा करु. त्यामुळे आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत रजनीकांत उतरणार हे नक्की मानलं जात होतं. तसंच रजनीकांत हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आज रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं एका पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे.

दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना रविवारी म्हणजेच 27 डिसेंबरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब उच्च होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रजनीकांत ‘अन्नाथे’ (Annaatthe) चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेल्या 12 दिवसांपासून हैदराबादमध्ये आहेत. 25 डिसेंबर रोजी अचानक त्याची तब्येत बिघडली होती त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, ज्यात त्यांनी सांगितले की, रजनीकांत यांची तब्येत बरी आहे, म्हणूनच त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जात आहे. ते म्हणाले की, सध्या रजनीकांत यांना विश्रांतीची आवश्यकता आहे.

संबंधित बातम्या:

रजनीकांत निवडणूक लढवणार नाहीत, पक्षाचीही माघार!

Rajinikanth Health Update | ‘थलायवा’च्या प्रकृतीत काहीशी सुधारणा, लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता!

Superstar Rajinikant will not enter politics