नवी दिल्ली : राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली. कोल्हापूरच्या सुनील मोदी यांनी ही मूळ याचिका दाखल केली होती. ती याचिका मागे घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालायने दिला. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदार निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ते आपल्या अधिकारातंर्गत विधान परिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती करु शकतात.
खरंतर हा भगतसिंह कोश्यारी यांच्यावेळचा विषय आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांच्या नावाची यादी कोश्यारी यांना दिली होती. पण राज्यपालांनी या आमदारांची नियुक्ती केली नाही.
उर्मिला मातोंडकर आमदार बनणार?
अखेर हा विषय सुप्रीम कोर्टात गेला होता. आता राज्यपाल नियुक्त 12 आमदार कोण असणार? याची उत्सुक्ता आहे. कारण आता राज्यात सरकार बदलल आहे. मविआने दिलेल्या यादीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच नाव होंत. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिंदे-फडणवीस सरकार कोणती नाव राज्यपालांना देणार? त्याची चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवार गटाकडून कोणाला संधी?
अजित पवार नव्याने सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला संधी मिळणार त्याची सुद्धा उत्सुक्ता आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या विषयावरुन भगतसिंह कोश्यारी आणि तत्कालिन उद्धव ठाकरे सरकारमध्ये वाद झाला होता.
सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करणारे सुनील मोदी आता नव्याने याचिका दाखल करणार असं म्हटलं जातय. त्यामुळे पुन्हा हा विषय सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो.