नवी दिल्ली : फॅक्ट चेकर मोहम्मद जुबेर (Mohammed Zubair) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जुबेर यांच्यावर दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. एवढेच नाही तर न्यायालयाने अटकेच्या आदेशावरही (Supreme Court) प्रश्न उपस्थित केले आहेत. मोहम्मद जुबेर यांनी यूपी पोलिसांनी (UP Police) त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या सर्व एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत अंतरिम जामीन देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने झुबेर यांंना जामीन मंजूर करताना म्हटले की, अटकेचा अधिकार संयमाने वापरला पाहिजे. जुबेरला अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा यूपी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Breaking: Supreme Court Orders To Release #MohammedZubair Forthwith in all UP cases
— Live Law (@LiveLawIndia) July 20, 2022
सुप्रीम कोर्टाने झुबेर यांच्यावर दाखल झालेले सर्व खटले एकत्र केले. आता एकच तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करणार आहे. न्यायालयाने उत्तर प्रदेशात नोंदवलेल्या 6 एफआयआर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे हस्तांतरित केल्या. याप्रकरणी तपासासाठी स्थापन करण्यात आलेली यूपीची एसआयटीही विसर्जित करण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण रद्द करण्यास नकार दिला. यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितले की झुबेर यांना भडकाऊ ट्विटच्या बदल्यात पैसे मिळत असे. पोस्ट किंवा ट्विट जेवढी प्रक्षोभक होती, तेवढे पैसे मिळाले. खरं तर मोहम्मद जुबेर यांनी यूपी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या सर्व एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत अंतरिम जामीन देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी सुनावणीदरम्यान झुबेर यांच्या वतीने वृंदा ग्रोव्हर म्हणाल्या झुबेरविरुद्ध नवीन एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि एक हातरस प्रकरण वगळता सर्व प्रकरणांमध्ये ट्विट हा एकमेव विषय आहे. सर्व प्रकरणांमध्ये एक ट्विट हा तपासाचा विषय आहे. याआधी 2018 च्या ट्विटबाबत दिल्लीत FIR दाखल झाली होती. यामध्ये जुबेरला जामीनही मिळाला आहे. पण दिल्ली पोलिसांनी तपास वाढवत लॅपटॉप जप्त केला. त्यांच्या ट्विटची भाषा चिथावणीचा उंबरठा ओलांडत नाही असेही झुबेर यांच्या वतीने सांगण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरमध्ये मी मुस्लिमांना जागतिक स्तरावर भडकवल्याचे म्हटले आहे! त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणतं ट्विस्ट घेणार? हेही पाहणं तितकेच महत्वाचे ठरणार आहे.