Supriya Sule Lok Sabha Suspension : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह 49 खासदारांचं निलंबन; आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी

| Updated on: Dec 19, 2023 | 2:37 PM

Supriya Sule Amol Kolhe and other MP Lok Sabha Suspension News in Marathi : संसद परिसरात गोंधळा प्रकरणी विरोधीपक्षातील खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात आवाज उठवला त्यानंतर 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यात महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे या दोन नेत्यांचा समावेश आहे.

Supriya Sule Lok Sabha Suspension : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह 49 खासदारांचं निलंबन; आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी
Follow us on

संदिप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 :  आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या या तीन खासदारांसह शशी थरूर, माला रॉय, मनीष तिवारी, चंद्रेश्वर प्रसाद, डिंपल यादव, कार्ति चिदंबरम, एसटी हसन यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.

निलंबित करण्याचं कारण काय?

13 डिसेंबरला चार जणांनी संसद परिसरात जात धुमाकूळ घातला. यातील दोन तरूणांनी लोकसभेत जात प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसतात. त्या बाकांवर उडी मारली. या दोघांनी लोकसभेत धुडगूस घातला. या तरूणांच्या बुटांमधून पिवळ्या रंगाचा धूर निघाला. यानंतर संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रकरणी चौकशी केली जावी आणि सरकारच्या बाजूने ऑफिशिअल स्टेटमेंट समोर यावं, यासाठी संसदेत विरोधक आवाज उठवत आहेत. याच कारणामुळे मागच्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित केलं जात आहे.

आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची नावं

1. व्ही. वैथिलिंगम
2. गुरजीत सिंग औंजला
3. सुप्रोया सुले
4. एसएस.पलानिमनिकम
5. अदूर प्रकाश
6. अब्दुल समद
7. मनीष तिवारी
8. प्रद्युत बोर्डोलोई
9. गिरधारी यादव
10. गीता कोरा
11. फ्रान्सिस्को सारादिना
12. एस. जगतरक्षक
13. एस.आर. पार्थिवन
14. फारुख अब्दुल्ला
15. ज्योत्सना महंत
16. A. गणेशमूर्ती
17. माला रॉय
18. पी. वेलुसामी
19. ए.चेल्लाकुमार
20. शशी थरूर
21. कार्ती चिदंबरम
22. सुदीप बंदोपाध्याय
23. डिंपल यादव
24. हसनानीन मसूदी
25. डॅनिश अली
26. खलीलुर रहमान
27. राजीव रंजन सिंह
28. DNV. सेंथिल कुमार
29. संतोष कुमार
30. दुलाल चंद्र गोस्वामी
31. रवनीत सिंग बिट्टू
32. दिनेश यादव
33. के सुधाकरन
34. मोहम्मद सादिक
35. एमके. विष्णुप्रसाद
36. पीपी मोहम्मद फैजल
37. सजदा अहमद
38. जसवीर सिंग गिल
39. महाबली सिंग
40. अमोल कोल्हे
41. सुशील कुमार रिंकू
42. सुनील कुमार सिंग
43. एसडी हसन
44. एम. दनुषकुमार
45. प्रतिभा सिंह
46. थोल थिरुमलवन
47. चंद्रेश्वर प्रसाद
48. आलोक कुमार सुमन
49. दिलीश्‍वर कामैत

कामकाज तहकूब

संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षातील खासदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. याचवेळी खासदारांना निलंबित करण्यात आलं. यानंतर विरोधकांनी लोकसभेत गदारोळ घातला. यानंतर आता लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया आली आहे. लोकसभेत लोकांच्या प्रश्नांसाठी गोंधळ घातला. म्हणून संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून सात वेळा संसदरत्न असलेल्या खासदार सुप्रियाताई सुळे निलंबित करण्यात आलं. मात्र संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना पास देणारा म्हैसूरचा खासदार अजूनही निलंबित झाला नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी दिली आहे.

आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन

लोकसभेत झालेल्या झालेल्या गोंधळानंतर देशभरातून संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला गेला. सहाजिकच विरोधी पक्षातील खासदारांनीही हाच सवाल सरकारला विचारला. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.