मुंबई : गुजरातच्या सहा महापालिका निवडणुकीत भाजपने अतिशय दमदार कामगिरी केलीय. पण भाजपच्या कामगिरी इतकंच आम आदमी पक्षानेही कष्ट घेतलं आहे आणि त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. सुरत महापालिकेत आम आदमी पक्षाने 27 जागा जिंकल्या आहेत, तिथे काँग्रेसला मात्र भोपळाही फोडता आलेला नाही. सुरतच्या महापालिकेत आम आदमी पक्षाने मारलेली मुसंडी देशात चर्चेचा विषय ठरत आहे. (Surat Municipal Election AAP Won 27 Seat And Become number 2 party)
सुरत महापालिकेच्या निवडणुकीत एकूण 120 जागांपैकी भाजपचे 93 तर आम आदमी पक्षाचे 27 नगरसेवक निवडून आले आहेत. दुसरीकडे काँग्रेसला मात्र एकही जागा जिंकता आली नाही. सुरतच्या महापालिका निवडणुकीत आपने एन्ट्री करुन आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
पहिल्याच प्रयत्नात आम आदमी पक्षाला सुरतच्या महापालिकेत जोरदार यश मिळालं. आपचे पार्टी प्रदेश अध्यक्ष गोपाल इटालिया जे स्वत: सुरतचे रहिवासी आहेत त्यांनी निवडणुकीचा प्रचार अतिषय उच्चम केला होता. तसंच ते पाटीदार समाजाचे आहेत. आपला मिळालेल्या बहुसंख्य जागांपैकी पाटीदार समाजाची मतं बहुमुल्य ठरली आहेत. तसंच त्याच मतांच्या जोरावर बहुसंख्य जागांवर आप उमेदवारांचा विजय झालेला आहे.
भाजप आणि आपने सूरतच्या महापालिकेत दमदार कामगिरी केलीय परंतु काँग्रेसला मात्र एकही जागा जिंकता आली नाही. पाटीदार समाजाची काँग्रेसवर असलेली नाराजी, असं यापाठीमागचं मुख्य कारण असल्याची चर्चा आहे.
प्रथमत: महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपने एन्ट्री केली आणि आता गुजरातच्या महापालिका निवडणुकीत… दिवसेंदिवस हळुहळु का होईना परंतु आपचा विस्तार देशभरात होतोय. दिल्लीतील लोकप्रिय असलेलं केजरीवाल सरकारच्या प्रतिमेमुळे मतदारांची पसंती आपला मिळते आहे.
आपसाठी सूरत महापालिकेतला विजय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण पुढच्या दीड वर्षात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. महापालिका निवडणुकीत यशस्वी एन्ट्री केल्यानंतर तसंच गुजरातमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाल्यानंतर आपसाठी ही मोठी संधी असणार आहे.
(Surat Municipal Election AAP Won 27 Seat And Become number 2 party)
हे ही वाचा :
Bank Holidays Complete List March 2021: मार्चमध्ये 11 दिवस बँका राहणार बंद; अशी आहे संपूर्ण लिस्ट