ट्रेनचे ‘तत्काल तिकीट’ बुकींग करताना ही घ्या काळजी, टेन्शन फ्रि प्रवासाची हमी

| Updated on: Mar 07, 2023 | 12:54 PM

जादा पैसे भरून कन्फर्म तिकीटाची गॅरंटी 'तत्काळ तिकीट' सेवेत आहे. परंतू हल्ली 'तत्काळ तिकीट' मिळणेही जड झाले आहे. त्यासाठी हे आहेत उपाय

ट्रेनचे तत्काल तिकीट बुकींग करताना ही घ्या काळजी, टेन्शन फ्रि प्रवासाची हमी
indian-railway
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : रेल्वेने ज्यांना अचानक परंतू हमखास कन्फर्म तिकीटाने प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी जादा पैसे भरून ‘तत्काळ तिकीट’ खरेदी करण्याची सोय रेल्वेने उपलब्ध केली आहे. त्यामुळे आपल्याला प्रवासाच्या एक दिवस आधी  ‘तत्काळ’ तिकीटाआधारे प्रवास करता येतो. परंतू होळीच्या सारख्या सणासुदीच्या दिवसात ही जादा पैसे भरून ‘तत्काळ तिकीट’ सुविधा कामी येईल याची काही गॅरंटी नसते, कारण तत्काळ तिकीटांची मागणीही प्रचंड वाढली आहे. त्यावरही आहेत उपाय ? काय ते पाहूया..

अनेक वेळा तत्काळ तिकीट बुक करूनही रिझर्वेशन मिळत नाही. एसी क्लास श्रेणीच्या तत्काळ तिकीट बुकींगचा वेळ सकाळी दहा वाजता सुरू होतो. नॉन एसी म्हणजे स्लिपर क्लासचा बुकींग वेळ सकाळी अकरा वाजता सुरू होतो. परंतू हल्ली तत्काळ तिकीटांची मागणी मोठी असल्याने तत्काळ तिकीट मिळणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे तत्काळ तिकीट बुक करताना काय ट्रीक वापरायची याची माहीती घेऊया…त्यामुळ तिकीट बुक करताच कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे.

मास्टर लीस्ट बनवावी

आपल्याला तत्काळची तिकीट बुक करताना सर्वात प्रथम आपली मास्टर लीस्ट बनवून ठेवणे उपयोगी ठरणार आहे. यासाठी आपल्याला आपली मास्टर लिस्ट तयार करण्याची गरज आहे. मास्टर लिस्टमध्ये आपल्याला आपल्या प्रवास करतानाच्या आपली वैयक्तिक माहीती भरणे गरजेचे असते. त्यामुळे तत्काळ तिकीट बुक करताना आपण आपली वैयक्तिक माहिती भरण्यासाठी जोवेळ घालवतो तो वाचणार आहे. त्यामुळे आपण तत्काळ बुकींग सुरू करताच या मास्टर लीस्टची निवड करताच आपला वेळ वाचणार आहे. कारण आपण आपली माहीती आधीच भरणार आहोत. आपल्याला आता केवळ लिस्ट जोडून थेट पेमेंट करावे लागेल.

– सर्वात आधी IRCTC च्या वेबसाइट वर जावे.

– वेबसाइट वर ‘My Account’ मध्ये जाऊन ‘My Profile’ वर क्लिक करावे.

– येथे आपल्याला ‘Add/Modify Master List’ चे ऑप्शन दिसेल

– येथे प्रवाशाचे नाव, जन्म तारीख, लिंग, आसन, जेवण आदी माहिती भरावी.

– यानंतर ‘Submit’ बटण वर क्लिक करावे

– अशी पॅसेंजरची मास्टर लिस्ट तयार होईल.

– तिकीट बुकिंगवेळी ‘My Passenger List’ वर जाऊन सरळ कनेक्ट करावे.

– नंतर पेमेंट ऑप्‍शन वर कोणताही एक पर्याय निवडून पेमेंट करावे