काबुल : अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान आपला कारभार कसा हाकणार (Taliban new government) याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. तालिेबानचं सरकार नेमकं कधी स्थापन होणार असाही प्रश्न विचारला जात होता. मात्र, तालिबानने आपल्या मंत्रिमंडळाची नुकतीच घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालिबान सरकारचे तसेच अफगाणिस्तानचे पंतप्रधान हे मुल्ला मोहम्मद हसन अखूंद (Mullah Mohammad Hassan Akhund) हे असणार आहेत. तशी घोषणा नुकतीच करण्यात आली. (Taliban announce his new government and all ministers mullah mohammad hassan akhund is prime minister of afghanistan all live update)
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आलीय. यात मुल्ला हसन अखूंद हे अफगाणिस्तानचे पंतप्रधान असतील. तालिबानच्या प्रवक्त्यानं मंत्रिमंडळाची घोषणा पत्रकार परिषदेत केली. अखूंद हे पंतप्रधान असतील तर ज्यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा होती, ते मुल्ला बरादर हे उपपंतप्रधान असतील. तालिबानच्या या मंत्रिमंडळात हक्कानींना वजनदार मंत्रिपद भेटलेलं आहे. सिराजुद्दीनं हक्कानी हे गृहमंत्री असतील.
दमदार मंत्रिपद मिळावं म्हणून तालिबान आणि हक्कानींमध्ये तणाव निर्माण झालेला होता. त्याचं फळ हक्कानींना मिळाल्याचं दिसतंय. अमीर मुताकी हे परराष्ट्रमंत्री असतील. अब्दूल सलाम हंफू यांनाही उपपंतप्रधान करण्यात आलंय. म्हणजेच अखुंद हे पंतप्रधान आणि त्यांचे दोन डेप्युटी. बरादर आणि हंफू. दोन उपपंतप्रधान असलेला अफगाणिस्तान सध्या तरी एकमेव देश असावा
अफगाणिस्तानमध्ये आता जे तालिबाननं सरकारची घोषणा केलीय ते काळजीवाहू सरकार असेल असं तालिबानच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलंय. याचाच अर्थ यात काही बदल अपेक्षित आहेत. हे अस्थायी सरकार आहे हेही तालिबाननं स्पष्ट केलंय. ह्या सरकारमध्ये तालिबानच्या मागच्या सरकारमध्ये जे कुणी नेते मंत्री होते, त्या सर्वांना स्थान देण्यात आलंय. तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमरच्या मुलालाही मंत्रीमिडळात स्थान आहे.
मुल्ला हसन अखूंद हा तालिबानचा संस्थापकांपैकी एक आहे. तालिबानच्या मागच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते. विशेष म्हणजे यूएनची दहशतवाद्यांची जी यादी आहे त्यात मुल्ला हसन अखूंद यांचं नाव आहे. अखूंद हे तालिबानचा जिथं जन्म झाला त्या कंदहारचेच आहेत. गेली वीस वर्ष ते तालिबानसाठी कार्यरत होते. अखूंद यांची ओळख ही मिलिटरी लीडर कमी आणि धार्मिक नेता म्हणून जास्त आहे. अखूंद हे फार खळबळपणे चर्चेत असणारे नेते नाहीत. पण शांत रहावून तालिबानचं त्यांनी अखंडपणे काम केलं. त्यामुळेच ते पंतप्रधानपदी पोहोचल्याचं मानलं जातंय.
अफगाणिस्तानचा नवा गृहमंत्री कोण असं जर कुणी विचारलं तर त्याचं आता उत्तर आहे सिराजुद्दीन हक्कानी. पण हक्कानीची एवढीच ओळख नाही. सिराजुद्दीन हक्कानी हा जलालुद्दीन हक्कानींचा मुलगा आहे जो वॉरलॉर्ड म्हणून ओळखला जातो. जलालुद्दीन हक्कानीनेच हक्कानी नेटवर्क उभं केलं, जे आधी सोव्हिएत यूनियनच्याविरोधात लढले आणि नंतर अमेरीकेच्या. त्यामुळे सिराजुद्दीन हक्कानी यूएनच्या लिस्टमध्ये जागतिक दहशतवादी म्हणून आहे. विशेष म्हणजे सिराजुद्दीन हक्कानीच्या डोक्यावर अमेरीकेनं 5 मिलियन डॉलरचं रिवॉर्ड ठेवलेलं आहे. FBI च्या वेबसाईटवर तशी माहितीही आहे. याचाच अर्थ असा की, अफगाणिस्तानच्या नव्या गृहमंत्र्याला जो कुणी पकडून देईल त्याला अमेरीका पाच मिलियन डॉलर देणार. अमेरिकेच्यादृष्टीनं सिराजुद्दीन हक्कानी फरार-गायब आहे. 2008 मध्ये काबूलच्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात सहा जणांचा बळी गेला होता. त्यात काही अमेरिकनही होते. ते सिराजुद्दीन हक्कानीनेच घडवल्याचा आरोप आहे. त्याचवर्षी म्हणजे 2008 सालीच तत्कालीन अफगाण राष्ट्रपती हमीद करजाई यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता, तोही सिराजुद्दीन हक्कानीनेच घडवल्याचा ठपका आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेची ज्या व्यक्तीवर जबाबदारी आहे. त्याची पार्श्वभूमी ही जागतिक दहशतवादाची आहे.
मुल्ला मोहम्मद हसन अखूंद-पंतप्रधान
मौलवी अब्दुल सलाम हनाफी- उपपंतप्रधान
मुल्ला अब्दुल गनी बरादर- उपपंतप्रधान
खैरउल्लाह खैरख्वा- माहिती मंत्री
अब्दूल हकीम- कायदामंत्री
मुल्ला याकूब – संरक्षणमंत्री
मुल्ला सिराजुद्दीन हक्कानी-गृहमंत्री
मुल्ला अमीरखान मोताकी- परराष्ट्र व्यवहारमंत्री
मुल्ला हेदायतुल्ला बद्री- अर्थमंत्री
शेख मुल्ला नूरुल्ला मुनीर- शिक्षणमंत्री
मुल्ला खैरुल्ला खैरखाह- माहिती आणि संस्कृतीमंत्री
शेख मुल्वा नूर मोहम्मद साकीब-हज आणि एंडोमेंट्स मंत्रालयाचे प्रमुख
मुल्ला अब्दुल हकीम शरी-न्यायमंत्री
इतर बातम्या :
(taliban announce his new government and all ministers mullah mohammad hassan akhund is prime minister of afghanistan all live update)