Madurai Train Fire : तामीळनाडूमध्ये ट्रेनला भीषण आग, आठ लोकांचा होरपळून मृत्यू

| Updated on: Aug 26, 2023 | 11:12 AM

लखनऊहून रामेश्वरमला निघालेल्या ट्रेनला भीषण आग, आठ प्रवाशांचा डब्ब्यात मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान विझवण्याचं काम युद्ध पातळीवर करीत आहेत. त्याचबरोबर रेल्वे पोलिस सुध्दा दाखल झाले आहेत.

Madurai Train Fire : तामीळनाडूमध्ये ट्रेनला भीषण आग, आठ लोकांचा होरपळून मृत्यू
Tamil Nadu 9 Killed As Massive Fire Breaks Out On Train At Madurai Railway Junction
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

तामीळनाडू : तामीळनाडूमध्ये (Tamil Nadu) मदुराई स्टेशनवर (Madurai Train Fire) यार्डमध्ये एका उभी असलेल्या ट्रेनला अचानक आग लागली. ही ट्रेन लखनऊहून रामेश्वरमला निघाली होती. आग इतकी भयानक होती की, संपूर्ण डब्ब्याला आगीने काहीवेळात वेडा घातला होता. त्या आगीत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाचे जवान विझवण्याचं काम युद्ध पातळीवर करीत आहेत. आगीची घटना पाहून इतर प्रवासी प्रचंड घाबरले आहेत. नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती मिळालेली नाही. रेल्वे पोलिस आणि इतर पथकं घटनास्थळी दाखल (Madurai Railway Junction) झाले असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

लखनऊहून रामेश्वरमला निघालेली ही ट्रेन सकाळी साडेपाच वाजता मदुराई स्टेशनवर थांबली होती. त्यावेळी गाडीला आग लागली आहे. आग लागल्याची माहिती सगळीकडं व्हायरल झाल्यानंतर तिथं अग्नीशमक दल आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं. तोपर्यंत आठ प्रवाशांचा आगीने मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाल्याची माहिती मिळाळी आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या डब्ब्याला आग लागली तो एक खासगी डब्बा होता. नागरकोइल जंक्शन येथे शुक्रवारी हा डब्बा जोडण्यात आला होता. त्या काही प्रवासी अवैद्यरित्या सिलेंडर घेऊन निघाले होते. त्यांच्याकडे असलेल्या गॅस सिलेंडरमुळं डब्ब्याला आग लागली असल्याचं अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे. एकचं डब्बा पूर्णपणे जळाला असून इतर डब्बे पुर्णपणे सुरक्षित आहेत असंही अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.