तामिळनाडू : तामिळनाडूच्या तंजावूरमध्ये (Tanjawar, Tamil nadu) भयंकर घटना घडली. तब्बल दहा जणांचा विजेचा शॉक (Electric Shock) लागून मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झालेत. तंजावूरच्या कालीमेडूमध्ये असलेल्या एका मंदिरात ही दुर्घटना (The temple palanquin) घडली. यात दहा जण जागीच ठार झाले. तर अनेक भाविक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य केलं. कालीमेडूमध्ये असलेल्या मंदिरात अप्पर गुरुपूजा उत्सव साजरा केला जात होता. या उत्सवात अनेक भाविक दाखल झाले होते. मंगळवार रात्रीपासून आजूबाजूच्या परिसरात भाविक या रथोत्सवासाठी दाखल झालेले. दरम्यान, तामिळनाडूमध्ये शॉक (Electric Shock) लागून झालेल्या दहा जणांच्या मृत्यूमुळे रथोत्सवाला गालबोट लागलंय. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. या घटनेनंच मृतांच्या नातलगांचा आक्रोळ काळीज पिळवटून टाकणारा होता.
बुधवारी सकाळी मुख्य रस्त्यावरुन पारंपरिक रथ यात्रा मार्गस्थ झाली होती. शेकडो भाविक यावेळी रथ ओढण्यासाठी उपस्थित होते. या दरम्यान, मोठा गोंधळ उडाला होता. त्याचवेळी विजेची एक तार रथाच्या संपर्कात आली. या तारेतून वीज वाहत असल्यामुळे करंट लागून दोन लहानग्यांसह एकूण दहा जणांचा जागीच जीव गेलाय. या घटनेनं एकच खळबळ उडाली.
सुरुवातीला नेमकं काय झालं होतं, हे कळायला काहीच मार्ग नव्हता. मात्र जोपर्यंत ही बाब लोकांच्या ध्यानात राहिली, त्यावेळी वेळ निघून गेली होती. दहा जणांचा जीव गेला होता. दरम्यान, शॉक लागल्याचं समोर आल्यानंतर गोंधळ उडाला. काही जणांना इलेक्ट्रीक शॉक लागून अनेकजण जखमी झाले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
#WATCH | At least 10 people died after a temple car (of chariot festival) came in contact with a live wire in the Thanjavur district in Tamil Nadu pic.twitter.com/F4EdBYb1gV
— ANI (@ANI) April 27, 2022
खरंतर या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती होती. कारण शेकडो लोकं या रथोत्सवात सामील झाले होते. विजेची तार रथाच्या संपर्कात आल्यामुळे रथ हाकणाऱ्यांना मोठा शॉक बसण्याची भीती होती. मात्र रथोत्सवावेळी रस्त्यावर पाण्याचे खड्डे आल्यानं बहुतांश भाविक रथापासून लांब गेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा अनेकांना जीव जाण्याची भीती होती.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं पोलिसांनाही कळवण्यात आलं. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत लगेचच बचावकार्य सुरु केलं. जखमींना रुग्णालयात दाखल केलं. मात्र दहा जणांचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केली जाते आहे.