लहानपणी आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारी 13 वर्षीय राखी सिंह प्रयागराजला महाकुंभसाठी आली आहे. या ठिकाणी आल्यावर तिच्या मनात अचानक वैराग्य निर्माण झालं. विरक्तीची भावना आली आणि तिने साध्वी बनण्याची इच्छा आईवडिलांना बोलून दाखवली. राखीच्या आईवडिलांनीही देवाचीच इच्छा समजून तिच्या इच्छेचा मान ठेवला. त्यानंतर तुला जूना आखाड्याच्या हवाली केले. रीमा जुना आखाड्यातून प्रवास करत आहे. यावेळी राखीची आई रीमा सिंह यांनी राखीच्या वैराग्यामागची कहाणी सांगितली. जुना आखाड्याचे महंत कौशल गिरी महाराज गेल्या तीन वर्षापासून माझ्या गावात भागवत कथा ऐकवायला येत आहेत. तिथेच 13 वर्षीय राखीने त्यांच्याकडून गुरू दीक्षा घेतली होती. आज तिला अचानक वैराग्य प्राप्त झालं आणि तिने संसार त्याग करण्याचा निर्णय घेतला, असं रीमा सिंहने सांगितलं.
रीमा सिंह यांनी याबाबत सविस्तर संवाद साधल्या. रीमा म्हणाल्या की, कौशल गिरी जी महाराज यांच्या सांगण्यावरून, त्या आपल्या पती संदीप सिंह आणि दोन मुलींसह मागील महिन्यात महाकुंभाच्या या शिविरात सेवा करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी सांगितले की, “एक दिवस मुलीने सांगितले की ती साध्वी बनू इच्छिते. ही प्रभूची इच्छा मानून आम्ही कोणताही विरोध केला नाही.” रीमा सिंह यांनी सांगितले की त्यांची मुलगी राखी आणि आठ वर्षीय निक्की यांना शिकवण्यासाठीच त्यांनी आग्रा शहरात भाड्याच्या घरात राहण्याचे ठरवले. त्यांचा नवरा या ठिकाणी पेठ्याचं दुकान चालवतात. त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी राखी हिचं स्वप्न आयएएस अधिकारी होण्याचं होतं, पण महाकुंभ मेळ्यात अचानक तिच्या मनात वैराग्य निर्माण झालं.
कुटुंबाने कोणत्याही दबावाखाली न येता मुलीला दान केलं आहे. संदीप सिंह ढाकरे आणि त्यांची पत्नी खूप काळापासून आमच्याशी जोडलेले आहेत. कुटुंबाच्या इच्छेने राखीला आश्रमात स्वीकारले गेले आहे आणि आता ती गौरी गिरी म्हणून ओळखली जाईल, अशी माहिती जुना आखाड्याचे महंत कौशल गिरी महाराज यांनी सांगितलं.
तुम्हाला तुमच्या मुलीची चिंता वाटत नाही का? असा सवाल रीमा सिंह यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिलं. आई म्हणून ही चिंता नेहमीच असते की त्यांची मुलगी कुठे आणि कशी आहे. नातेवाईक विचारतात की अखेर त्यांनी मुलीला दान का दिलं? आम्ही त्यांना सांगतो ही तर प्रभूची अशी इच्छा होती, असं रीमा सिंह म्हणाल्या. गौरीचे पिंडदान आणि इतर धार्मिक संस्कार 19 जानेवारीला केले जातील, त्यानंतर ती गुरुच्या कुटुंबाची सदस्य होईल, अशी माहिती आखाड्याच्या संतांनी दिली आहे.