तेजसचे उड्डाण आता खाजगी कंपन्यांच्या मदतीने होणार, वायूसेनेला मिळणार नवी ताकद

| Updated on: Mar 18, 2025 | 11:09 AM

तेजस जेट फायटर लवकरच हवाई दलात सामील होणार आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे सांगत आम्ही पहिल्या एलसीए तेजस जेट फायटरला ( मार्क 1 A) रियर फ्जुजलेझ वितरीत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

तेजसचे उड्डाण आता खाजगी कंपन्यांच्या मदतीने होणार, वायूसेनेला मिळणार नवी ताकद
Follow us on

भारतीय वायूसेनेच्या जेट फायटर तेजसची निर्मिती हिंदुस्थान एअरोनॉटीक लिमिटेड (HAL) करीत असली तरी या सरकारी कंपनीला आता खाजगी कंपनी मदत करणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पहिला ‘रिअर फ्युजलेझ’ हिंदुस्थान एअरोनॉटीक लिमिटेड कंपनीला सोपविण्यात आला आहे.  लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट ( LCA ) तेजस जेट फायटर या देशी बनावटीच्या विमानाची भारताला अत्यंत गरज असल्याने वायूदलाला ही विमाने आता येत्या एक- दोन वर्षांत आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे ध्यैय गाठता येणार आहे.

अल्फा टोकोल इंजीनियरिंग सव्हीसेज प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीच्या मदतीने हिंदुस्थान एअरोनॉटीक लिमिटेड (HAL) कंपनीला तेजस जेट फायटर तयार करण्यासाठी ‘रिअर फ्युजलेझ’ सोपविण्यात येत आहेत. एलसीए तेजस जेट फायटर कार्यक्रमात आता खाजगी कंपन्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे. प्रथमच भारतीय हवाई दलासाठी एखादी खाजगी कंपनी फ्युजलेझ आऊटसोर्स करणार आहे.

अमेरिकेने इंजिनांना उशीर

खाजगी कंपनीच्या सहभागामुळे आता भारताला अत्यंत आवश्यक असणारी तेजस जेट फायटर विमाने अत्यंत वेगाने मिळणार आहेत. फ्युजलेझची वेळेवर उपलब्धता झाल्याने तेजसचा कार्यक्रम वेगाने पुढे जाणार आहे. हिंदुस्थान एअरोनॉटीक लिमिटेड (HAL) तीन उत्पादन मार्गिकांवरुन LCA Mk1 A च्या डिलिव्हरी योजनाबद्ध पद्धतीने सुरु होणार आहे. अमेरिकेने इंजिनांचा पुरवठा रोखल्याने तेजसची ( MK-1A ) निर्मिती आधीच रखडली होती. या इंजिनाचा पुरवठा वेगाने व्हावा यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यादरम्यान अजूनही चर्चा सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

25-26 आर्थिक वर्षात डिलिव्हरी

साल 2025-26 पर्यंत तेजस जेट फायटर विमानांचा पुर्तता सुरु होईल असे म्हटले जात आहे.साल 2025-26 पासून दरवर्षी 16 ते 24 तेजस जेट फायटर विमानाचे उत्पादन केले जाणार आहे. अमेरिकन कंपनी जीईने तेजससाठी इंजनांचा पुरवठा करणार आहे.

फ्यूजलेझ काय आहे?

फ्यूजलेझ म्हणजे विमानाचा मु्ख्य सांगाडा. ज्यात पायलट, प्रवासी आणि कार्गो सामान ठेवले जाते. हा भाग विमानाच्या इंजिन आणि शेपटीला जोडतो. अनेक खाजगी इंजिन कंपन्यांना फ्युजफेझच्या डिलिव्हरीसाठी ऑर्डर दिल्या आहेत.

अमेरिकी अपाचे हेलिकॉप्टरला मदत

भारताने जगातील सर्वात घातक हेलिकॉप्टर असलेल्या अमेरिकन अपाचे साठी भारतात फ्यूजलेझ तयार केले आहे. जानेवारी 2023 मध्ये टाटा एडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड आणि बोईंगच्या संयुक्त उद्योजक टाटा बोईंग एअरोस्पेस लिमिटेडने अपाचे हेलिकॉप्टर फ्यूजलेझ सोपवले आहेत.