T. Raja Singh : तेलंगणाचे भाजपा आमदार टी. राजा सिंह यांना अटक; वादग्रस्त वक्तव्य भोवले, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

| Updated on: Aug 23, 2022 | 12:24 PM

तेलंगणाचे भाजपा आमदार टी. राजा सिंह (T. Raja Singh) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपा (BJP) आमदार टी. राजा सिंह यांनी कथीतरित्या मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

T. Raja Singh : तेलंगणाचे भाजपा आमदार टी. राजा सिंह यांना अटक; वादग्रस्त वक्तव्य भोवले, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
Follow us on

हैदराबाद : तेलंगणाचे भाजपा आमदार टी. राजा सिंह (T. Raja Singh) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपा (BJP) आमदार टी. राजा सिंह यांनी कथीतरित्या मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याने संतप्त जमाव हैदराबादच्या रस्त्यावर उतरला. त्यानंतर आज सकाळी टी. राजा सिंह यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. त्यांनी कथितरित्या मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात हैदराबादमध्ये (Hyderabad) अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. दबीरपुरा, भवानी नगर, रेनबाजार, मीरचौक पोलीस ठाण्यात राजा सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी यासाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.राजा सिंह यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. नागरिक रस्त्यावर उतरल्याने अखेर पोलिसांनी राजा सिंह यांना अटक केली आहे.

नेमक प्रकरण काय?

तेलंगणाचे भाजपा आमदार टी. राजा सिंह यांनी कथीतरित्या मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य  केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे भावना दुखावल्याने मोठ्यासंख्येनं समुदाय हैदराबादच्या रस्त्यावर उतरला. तसेच राजा सिंह यांच्याविरोधात अनेक ठिकणी तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होत्या. राजा सिंह यांना अटक करण्याच्या मागणीसाठी दबीरपुरा, भवानी नगर, रेनबाजार, मीरचौक पोलीस ठाण्यात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अखेर आज राज सिंह यांना अटक करण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. नागरिक रस्त्यावर उतरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत टी. राजा सिंह?

टी.राजा सिंह हे भाजपाचे हैदराबादमधील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी कॉमेडियन मुनव्वर फारूकी यांना देखील धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. रिपोर्टमधून मिळत असलेल्या माहितीनुसार टी.राजा सिंह यांनी मुनव्वर फारूकी यांना शो रद्द करण्यास सांगितले होते. या प्रकरणात देखील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. टी. राजा यांच्या आधी नुपूर शर्मा यांनी देखील मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केलं होत. त्याविरोधात देशात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते.