हैदराबाद: महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन एअर लिफ्ट करावा लागेल असं म्हटलं होतं. ऑक्सिजन एअरलिफ्ट करण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घ्यावी लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मांडलेली कल्पना प्रत्यक्षात तेलंगाणामध्ये आली आहे. तेलंगाणा सरकारनं ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्याासाठी भारतीय हवाई दलाच्या मदतीनं ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. (Telangana first state which airlift oxygen tanker to Begumpet to Bhubaneswar)
ऑक्सिजन तुडवड्यावर मार्ग काढण्याासाठी तेलंगाणा सरकारानं हवाई दलाची युद्धामध्ये वापरली जाणारी विमानं वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सिजन टँकर घेऊन पहिलं विमान तेलंगाणातील बेगमपेट विमानतळावरून भुवनेश्वरला रवाना झाले आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथून ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. विमानांद्वारे 14.5 मेट्रिक टन ऑक्सिजन एअरलिफ्ट करण्यात येईल. यासाठी आठ टँक वापरण्यात येतील.
तेलंगाणा सरकारमधील नगरविकास मंत्री केटीआर यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी आरोग्यमंत्री इटाला राजेंद्रकुमार आणि तेलंगाणाचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांचे आभार मानले आहेत. हैदराबाद आणि भुवनेश्वर ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट केल्यानं तीन दिवस वाचतील आणि नागरिकांचे जीव वाचतील, असं केटीआर म्हणाले आहेत.
My compliments to both Health Minister @Eatala_Rajender Garu & @TelanganaCS Somesh Kumar Garu who are supervising Oxygen tankers airlifting from Hyderabad to Orissa to bring back oxygen faster to Telangana – saving 3 days & many valuable lives. First time in India#NeedOfTheHour pic.twitter.com/gAIjpeAOas
— KTR (@KTRTRS) April 23, 2021
विशाखापट्टणम येथून महाराष्ट्राकडे निघालेली ऑक्सिजन ट्रेन आज रात्री नागपूरमध्ये पोहोचणार आहेत. तर उद्या सकाळी नाशिकला पोहोचेल. नाशिकमधून राज्यातील विविध भागात ऑक्सिजन पोहोचवला जाणार आहे.
बेल्लारी, भिलाई , अंगुल, पेरामंबुदूर, विशाखापट्टण इथं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्लांट निर्मिती केली जाते.
संबंधित बातम्या
शरद पवार ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी मैदानात, साखर कारखान्यांना निर्मिती करण्याचे आदेश
Virar Hospital Fire | विरारच्या आगीत कोण कोण होरपळले? वाचा संपूर्ण यादी
(Telangana first state which airlift oxygen tanker to Begumpet to Bhubaneswar)