नवी दिल्ली : येत्या काही महिन्यात तेलंगणा (telangana) राज्यात निवडणुका होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे त्या राज्यात आतापासून राजकीय नेत्यांनी भेटी वाढवल्या आहेत. शनिवारी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) तिथं होते, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) तिथं जाणार आहेत. अमित शहा आज तेलंगणा राज्यात भेट देणार असल्यामुळे काल मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्यावर निशाना साधला आहे. हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ज्यावेळी अमित शहा येतील तेव्हा त्यांना सांगा इस्रोची निर्मिती काँग्रेसने केली आहे.
मल्लिकार्जुन खरगे पुढे बोलताना म्हणाले की, अमित शहा विचारत आहेत की, काँग्रेसने मागच्या ५३ वर्षात काय केलं, तर त्यांना आमचं रिपोर्ट कार्ड आठवणीने सांगा. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर काँग्रेसने देशात ५६२ संस्थानांचे विलीनीकरण केले. सरदार पटेल यांनी देशाला एकत्र केलं. देशाला संविधान हे आंबेडकर आणि काँग्रेसने दिलं. त्याचबरोबर आईआईटी, आईएमएम, एम्स, इसरो, डीआरडीओ, HAL, ओएनजीसी, BEL, सेल हे सगळं पंडित नेहरु आणि काँग्रेसने दिलं असल्याचं सुध्दा आवर्जून सांगितलं.
ज्यावेळी देशात एक सुई सुध्दा तयार झाली नव्हती. त्यावेळी आम्ही मोठे-मोठे कारखाने तयार केले. हैदराबाद, बेंगळुरू, मुंबई, कोलकाता, दिल्ली, कानपूर आम्ही देशात सगळीकडं कारखाने तयार केले आहेत. ही काँग्रेसची देणगी आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी भाजपचे नेते जातात आणि काँग्रेसवर टीका करतात.
आम्ही सगळ्यांनी भाजपला हटवण्याची तयारी केली आहे. परंतु केसीआर एका सुध्दा मिटींगला आली नाही. त्यांनी भाजपसोबत गठबंधन केल्याचा आरोप सुध्दा खरगे यांनी केला. ज्यावेळी आतमध्ये एकमेकांचा करार झाला असेल त्यामुळे केसीआर भाजपच्या विरोधात बोलायला तयार नाही. आम्ही काय मीटिंग करीत आहोत. त्यामुळे आम्हाला भाजप आणि केसीआर या दोन पक्षांना इथून हटवायचं आहे.