राजस्थानच्या सीकरमध्ये आज दुपारी भीषण अपघात झाला आहे.सीकर जिल्ह्याच्या लक्ष्मण गढ परिसरात प्रवाशांनी भरलेली एक प्रायव्हेट बस पुलावर अनियंत्रित झाली आणि त्यानंतर ती पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळली. या घटनेत बसचा चक्काचूर झाला असून, या बसमधील दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सीकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शीने या अपघाताबाबत बोलताना सांगितलं की, बर प्रचंड वेगात होती, अचानक अनियंत्रित झाली आणि पुलाच्या भिंतीला जाऊन धडकली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या अपघातामध्ये दाहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये बसचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघात घडला तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाला आहे, मात्र चालकाचं बसवरील नियंत्रण अचानक कसं सुटलं याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.