नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आलं आहे. जम्मू आणि अनंतनाग पोलिसांनी एक संयुक्त मोहीम राबवत लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकच्या मुसक्या आवळल्या आहेत. लष्कर-ए-मुस्तफा ही दहशतवादी संघटना काश्मीर घाटीमधील पाकिस्तानी दहशतवादी समूह जैश-ए-मोहम्मदची प्रमुख संघटना आहे.(Terrorist attack on Jammu and Kashmir foiled, Hidayatullah Malik arrested by police)
जम्मूच्या पोलिस महासंचालकांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. मलिकला अटक केल्यानंतर कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. प्राथमिक तपासात हिदायतुल्ला मलिक हा जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचत होता.
Hidayatullah Malik, chief of Lashkar-e-Mustafa terror organisation, has been arrested from Jammu in a joint operation by Jammu & Anantnag police. Lashkar-e-Mustafa is an offshoot of Jaish-e-Mohammad in Kashmir: Jammu and Kashmir Police
— ANI (@ANI) February 6, 2021
जम्मूचे एसएसपी श्रीधर पाटील यांनी सांगितलं की, जम्मूच्या कुंजवानीजवळ दहशतवादी हिदायतुल्ला मलिकला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड हस्तगत करण्यात आला आहे. जेव्हा पोलिस त्याला अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्याने पोलिसांवर हल्ला केल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
जम्मू-काश्मीरमध्ये आता सर्व भागात 4G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या सूचना विभागाचे प्रधान सचिव रोहित कन्सल यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये कलम-370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या सर्वच भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पुढे सरकारने तिथे 2G इंटरनेट सेवा सुरु केली होती. तसंच जम्मूमधील उधमपूर, तर काश्मीरमधील गंदेरबल या जिल्ह्यांमध्ये वर्षभरानंतर 4G इंटरनेट सेवा सुरु केली होती. पण अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र आतापर्यंत ही सेवा सुरु करण्यात आली नव्हती.
4G इंटरनेट सेवा सुरु केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट केलंय. “4G मुबारक! ऑगस्ट 2019 नंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये सर्वांकडे 4G मोबाईल डेटा असेल. देर आये, दुरुस्त आये!” , असं अब्दुल्ला म्हणाले.
4G Mubarak! For the first time since Aug 2019 all of J&K will have 4G mobile data. Better late than never.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 5, 2021
संबंधित बातम्या :
‘कोरोनामुळे पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही’, फारुक अब्दुलांच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये अखेर दीड वर्षानंतर 4G इंटरनेट सेवा सुरु
Terrorist attack on Jammu and Kashmir foiled, Hidayatullah Malik arrested by police