काश्मीर : रविवारी दक्षिण काश्मीरमधील (Kashmir) पुलवामा (Pulwama) येथे दहशतवाद्यांनी (Terrorist Attack) सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला केला. दहशतवादी हल्ल्यात एक CRPF जवान शहीद झाला आहे. स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफचे जवान नाक्याजवळ तपासणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला केला. ही घटना गोंगू क्रॉसिंग परिसरातील सांगितली जात आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी मोर्चेबांधणी केली असून दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रविवारी दुपारी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील गोंगू क्रॉसिंगजवळील रस्त्यावर पोलिस आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक तपासणीत गुंतले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्यात सीआरपीएफचा एएसआय शहीद झाला. या हल्लाने पुन्हा काश्मीरातलं वातावरण तापलं आहे. हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे दहशतवाद्यांनी वर्तुळाकार रस्त्यावर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकावर गोळीबार केला, ज्यात CRPF चे ASI जखमी झाले. जखमी अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे, अशीही माहिती सुरक्षा दालाकडून देण्यात आली आहे.
#Terrorists fired upon Naka party at Gangoo Crossing #Pulwama from nearby Apple orchard. In this #terror incident 01 CRPF personnel ASI Vinod Kumar got seriously injured. He was shifted to hospital for treatment where he attained #martyrdom. Area cordoned off. Search in progress
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) July 17, 2022
काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसात पुन्हा सुरक्षा दलावरील हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यामुळे असे हल्ले दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहेत. अशा हल्ल्यांना सुरक्षा दलाकडूनही तसेच प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र हे हल्ले थांबवण्याचे मोठे आव्हानही सुरक्षा दलासमोर असणार आहे. अशा हल्ल्यात अनेक नागरिकांचा जीवही धोक्यात येतो. या परिसरात गोळीबार झाल्याने सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे.