आता कुठेही मिळवा सुपरफास्ट इंटरनेट, इलॉन मस्क भाऊंचा भन्नाट प्लान

| Updated on: Jun 23, 2024 | 4:08 PM

SpaceX ही इलॉन मस्क यांची कंपनी आहे. अंतराळात जाणाऱ्या प्रक्षेपण यानासाठी रॉकेट लाँचर आणि इतर उपकरणे ही तयार करीत असते. SpaceX ने 2019 साली Starlink लाँच केली होती, ज्यामुळे पृथ्वीच्या जवळील कक्षेत उपग्रह पाठविले जातात....

आता कुठेही मिळवा सुपरफास्ट इंटरनेट, इलॉन मस्क भाऊंचा भन्नाट प्लान
ELON MUSK
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

टेस्ला आणि एक्सचे मालक इलॉन मस्क यांनी आता फूल स्पीड इंटरनेट देण्यासाठी भन्नाट प्लान आखला आहे. मस्क यांच्या स्पेस एक्सच्या स्टारलिंक कंपनीने एक खास प्रोडक्ट बाजारात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे नाव स्टार लिंक मिनी असे आहे. हा एक सॅटेलाईट इंटरनेट ॲण्टेना आहे. या सॅटेलाईट इंटरनेट राऊटरला आपण कुठेही सोबत घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला थेट उपग्रहांद्वारे फूल स्पीड इंटरनेट मिळणार आहे. याचे वजन केवळ 1.3 किलोग्रॅम आहे. ज्याला आपण सोबत घेऊन कुठेही फिरु शकतो. तर पाहूयात इलॉन मस्क भाऊंची काय आहे ही क्रांतीकारी योजना…

अब्जाधीश इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स यांनी मोठी घोषणा केली आहे. या कंपनीने स्टारलिंक मिनी प्रोडक्टला लॉंच केले आहे. या सॅटेलाईटवरुन इंटरनेट पुरविणाऱ्या गॅझेटमुळे इंटरनेट क्षेत्रात क्रांती येणार आहे. त्यामुळे कोणत्या दुर्गम परिसरात डोंगर दऱ्याखोऱ्यात फूट स्पीड इंटरनेट सेवा मिळणार आहे. या सॅटेलाइट एण्टीनामध्ये इन बिल्ट वायफायचा सपोर्ट आहे.ज्याच्या मदतीने आपल्या डीव्हाईसमध्ये हाय स्पीड इंटरनेट मिळणे शक्य होणार आहे. याची किंमत केवळ 599 अमेरिकी डॉलर आहे. हा पोर्टेबल सॅटेलाईट इंटरनेट एण्टीना स्टॅंडर्ड डिशच्या तुलनेत 100 डॉलर महागडा आहे. स्टारलिंक मिनी कीट आधी असलेले ग्राहकच खरेदी करु शकणार आहेत. या स्टारलिंक इंटरनेटचे 99 देशात 3 लाख युजर आहेत. लवकरच आशियाई देशात ही सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु होणार आहे.

डाटा मर्यादेची कॅप

Starlink च्या आधीच्या ग्राहकांनाच ही सेवा सध्या उपलब्ध असणार आहे. त्यांनाच Mini Roam service चे देखील ऑप्शन मिळणार आहे. स्टार लिंक या उपकरणावर डाटा मर्यादेची कॅप लावली आहे. ती दर महीन्याला 50GB डाटा वापरु देणार आहे. स्टारलिंकचे जुने कस्टमर या दोन्ही सर्व्हीस वापर करु असतील तर त्यांना केवळ 150 अमेरिकी डॉलरची फी भरावी लागणार आहे. याच्या मदतीने यूजर्स हाय स्पीड इंटरनेट डाटा मिळणार आहे.

एक्सवरील पोस्ट येथे पाहा –

SpaceX च्या स्टार लिंक व्हीपीने केली पोस्ट

SpaceX च्या स्टारलिंक इंजीनियरिंगचे व्हीपी मायकल निकोल यांनी यासंदर्भात एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी स्टारलिंक मिनी सोबत वायफाय इंटेग्रेटेडची माहिती दिली आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारात याचे उत्पादन केले जाणार आहे.