मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक वाद टोकाचा चिघळा असून आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. अशा प्रतिक्रिया आता महाराष्ट्रातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर चढून महाराष्ट्रविरोधी घोषणा देणे चालूच ठेवले आहे. त्यात आणि आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे गदगमध्ये दहन केले गेल्याने हे वातावरण आणखी चिघळणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री अरविंद सावंत यांना इशारा दिला आहे की, कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जो काही कर्नाटकाच उच्छाद मांडला आहे.
तो चुकीचा असून कन्नडिगांच्या ॲक्शन महाराष्ट्रही रिॲक्शन देईल असा इशारा खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे.
ठाकरे गटाकडून आता महाराष्ट्र-कर्नाटक वादावरुन जशास तसे उत्तर देण्याची तयारी आमची असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी खासदार अरविंद सावंत म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानं जर हिंसक वळण घेतलं तर ?
ज्या प्रकारे कर्नाटकात महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या ज्या प्रमाणे आडवल्या जात आहेत, ज्या प्रकारे तोडफोड केली जात आहे. त्याच प्रकारे महाराष्ट्रातही रिॲक्शन मिळेल असा थेट इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई यांना देण्यात आला आहे.
खासदार अरविंद सावंत यांनी कर्नाटक-सीमावादावरून आता शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. सीमावादावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरही ठपका ठेवला आहे.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, सीमावादावर केंद्राने लक्ष घालावे म्हणून आम्ही गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेलो होतो मात्र त्यावेळी त्यांची भेट झाली नाही.
याभेटीविषयी सांगताना ते म्हणाले की, गृहमंत्र्यांनी सीमावादाविषयी बोलण्यासाठी आम्हाला वेळ दिली होती. मात्र ते भेटले नाहीत असंही त्यांनी सांगितले. कदाचित मिंधे गटाला आधी भेटायचं असावं किंवा गुजरात निकाल असावा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
महाराष्ट्र-कर्नाटक वादाबाबत जे आज आम्ही निवेदन देणार होतो ते दिलं आहे असल्याची माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे.