हरियाणा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नामिबियातून (Namibiya) आठ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील (Madya Pradesh) एका नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात आले आहे. या चित्त्यांमुळे राज कारण तापले आहे. त्यातच या चित्त्यांना भोजनासाठी जिवंत प्राणी देण्यात येत असल्याने नवा वाद पेटला आहे. यावरुन हरियाणातील बिश्नोई समाज(Bishnoi community ) चांगलाच आक्रमक झाला आहे.
आफ्रिकेमधून भारतामध्ये आठ चित्ते आणण्यात आले आहेत. या तिची त्यांच्या भोजनासाठी जिवंत प्राणी त्या ठिकाणी सोडण्यात आले आहेत त्यामध्ये काळवीटाचा सुद्धा समावेश आहे.
यावरून बिस्नोई समाज आक्रमक झाला आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
चित्त्यांना भोजनासाठी जिवंत प्राणी देणे हा प्रकार म्हणजे क्रूरता आहे. ज्या ऑर्गनायझरने हा उपक्रम राबवला त्या ऑर्गनायझरची क्रूरता या संपूर्ण प्रकारामधून समोर येते असे जयंत पाटील म्हणाले.
या निर्णयाविरोधात हरियाणातील फतेहाबादमध्ये बिश्नोई समाजाने आंदोलन छेडले आहे. चित्तांसमोर जिवंत चितळ-हरीण यांना अन्न म्हणून टाकण्याला समाजाचा विरोध आहे. यासाठी मागील दोन दिवसांपासून बिश्नोई समाज आंदोलन करत आहे.
सरकारने ज्या प्रकारे चित्त्यांच्या संरक्षणासाठी विशेष मोहिम राबवली आहे तसेच हरणांचाही बचाव झाला आहे. राजस्थान, हरियाणासारख्या राखीव भागात हरणांच्या प्रजाती नामशेष होत आहेत.
यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहोत. तेथे सरकारने विशेष प्रकल्प आणून हरणांची संख्या वाढवावी अशी मागणी अखिल भारतीय जीव रक्षा बिष्णोई सभेचे प्रदेशाध्यक्ष विनोद कडसरा यांनी केली आहे.