नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (central government) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जी घोषणा सेंट्रल पब्लिक एंटरप्राइजेज (CPEs) कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली आहे. महागाईच्या काळात त्यांना मदत व्हावी, यासाठी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ (Increase in inflation allowance) करण्यात येते. सध्या जी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. ती 1 जुलै 2023 पासून ही वाढ लागू होणार आहे.
बिझनेस टुडेच्या माहितीनुसार, सेंट्रल पब्लिक एंटरप्राइजेजच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 1992 आईडीए नुसार करण्यात आला आहे. 1 जुलै 2023 पासून नवीन दरानूसार 3,500 रुपये प्रति मुळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 701.9 टक्के म्हणजे 15,428 लागू होणार आहेत. 3,501 रुपयांपासून 6,500 रुपये महिना पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 526.4 टक्के म्हणजे 24,567 रुपये लागू होणार आहेत.
त्याच्यानंतर 6,500 रुपये 9,500 रुपये पगार बेसिक पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 421.1 टक्के वाढ होईल, ती रक्कम 34,216 रुपये असेल. 9500 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 351 टक्के असेल. तो 40,005 रुपये असेल. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांच्या महागाई भत्त्याची गणना सध्याचा डीए आणि मूळ पगाराच्या गुणाकाराच्या आधारे केली जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांची रक्कम ५० पैशाच्यावरती गेली तर त्याला एक रुपाया मानला जाईल. जर रक्कम ५० पैशापेक्षा कमी असेल तर त्याला शुन्य मानलं जाईलं. समजा डीए 150.75 रुपये असेल तर 151 रुपये मानले जातील.
कर्मचाऱ्यांच्या डीएचे नवे दर 1 जुलै, 2023 पासून लागू होतील. जुन्या प्रणालीनुसार, प्रत्येक पॉइंटसाठी 2 रुपये मानले जातील. AICPI च्या कार्यकारिणीसाठी रु. 16215.75 चा DA दिला जाईल.