NHS ने आपल्या रजोनिवृत्ती पृष्ठावरील (menopause page) दिसणार्या काही शब्दांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. महिला आणि स्त्री असे शब्द यापुढे रजोनिवृत्तीच्या पृष्ठावर दिसणार नाहीत. रजोनिवृत्ती हा शब्द महिलांच्या मासिक पाळीच्या कालावधीशी संबंधित आहे, आणि त्याची लक्षणे 40 ते 50 या वयोगटात दिसून येतात. पृष्ठावरील हे शब्द काढून टाकण्यामागील NHS चा उद्देश लिंग समावेशक भाषा (Gender inclusive language) वापरणे हा आहे. सर्वच घटकांपर्यंत ही माहिती पोहचविणे हा त्यामागचा उद्देश आहे. NHS च्या मते, असे केल्याने त्यांच्या वेब पृष्ठांवर सर्वसमावेशक भाषेचा ट्रेंड आणखी वाढू शकतो. अलीकडे, NHS ने, त्याच्या उद्दिष्टाच्या पुढे, त्याच्या होम पेजवरून डिम्बग्रंथि, गर्भाशय आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग यांसारखे शब्द देखील काढून टाकले आहेत.
मात्र, यूकेचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी रजोनिवृत्तीबाबत घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. डेली मेल शी बोलताना ते म्हणाले की, ज्या ठिकाणी लैंगिकतेशी संबधीत गोष्टींची माहिती दयायची असते. तेथे स्री पुरुष असा लिंगभेद करून, शब्दाचा वापर करणे महत्त्वाचे असते. परंतु स्रीयांबाबत सर्वोत्तम उपचार, अशा भाषेतून संवेदनशीलता दिसून येते, मात्र सामान्यज्ञान लक्षात घेऊन योग्य भाषेचा वापर केला पाहिजे. जेणेकरून लोकांना योग्य माहिती देता येईल, असे ते म्हणाले.
यापूर्वी, रजोनिवृत्तीच्या पानावर असे लिहिले होते की, जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येणे थांबते आणि ती नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकत नाही तेव्हा रजोनिवृत्ती येते. तथापि, आता पृष्ठावर असे दिसून येईल की जेव्हा मासिक पाळी येणे थांबते तेव्हा रजोनिवृत्ती होते आणि त्यामागील हार्मोनची पातळी कमी होते. रजोनिवृत्ती हा वयाचा एक नैसर्गिक भाग आहे जो 45 ते 55 या वयोगटात होतो. जर त्याची सरासरी यूकेमध्ये पाहिली तर महिलांना वयाच्या 51 व्या वर्षी याचा सामना करावा लागतो.
NHS च्या डिजिटल प्रवक्त्याने या विषयावर त्यांचे मत दिले आहे. MailOnline शी केलेल्या संभाषणात त्यांनी सांगितले की, वेबसाईट प्रत्येकाला योग्य माहिती देते आणि आम्ही योग्य बदलांसाठी वेबपेजचा आढावा घेत राहते. जेणेकरून भाषा अधिकाधिक सर्वसमावेशक बनवता येईल. तसेच, असे केल्याने भाषा अधिक आदरणीय आणि समस्येशी जोडलेली दिसेल.