ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. त्या गेल्या कित्तेक दिवसांपासून आजारी होत्या. एलिजाबेथ यांच्या निधनानंतर दहा दिवसांनी म्हणजे १९ सप्टेंबरला महाराणी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील. अशावेळी पुढील ९ दिवस कोणत्या विधी होणार ते जाणून घेऊया.
९ सप्टेंबर – ९ सप्टेंबर हा दिवस डेथ डे या नावानं ओळखला जाईल. डेथ डे च्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबरला महाराणी एलिजाबेथ यांचा मुलगा चार्ल्स यांना जेम्स पॅलेसच्या बैठकीत ब्रिटनचा राजा घोषित करण्यात आले.
११ सप्टेंबर – महाराणी यांच्या पार्थिव शरीरास बंकिगघम पॅलेसमध्ये आणलं जाणाराय. महाराणी यांचे ताबूत शाही ट्रेननं लंडनला आणलं जाईल.
१३-१६ सप्टेंबर – महाराणी यांचा मुलगा चार्ल्स वेस्टमिंस्टर हॉलमध्ये शोकसभा करतील. त्यानंतर नवीन राजा म्हणून युनाईटेड किंगडमच्या दौऱ्याची सुरुवात करतील.
उत्तर आयर्लंडला पोहचल्यानंतर बेलफास्टमध्ये सेंट ऐनी कॅथेड्रलमधील एका सेवेत भाग घेतील. त्यानंतर महाराणी यांचा ताबूत बंकिगघम पॅलेसमधून वेस्टमिंस्टर महलात नेला जाईल. ताबूत आल्यानंतर वेस्टमिंस्टर हॉलसमध्ये एक सेवा आयोजित केली जाईल.
१७-१९ सप्टेंबर – वेस्टमिंस्टर हॉलमध्ये त्यांचे पार्थिव शरीर ठेवले जाईल. दरम्यान लोक त्यांचे अंतीम दर्शन करतील. हॉल राणीच्या दर्शनासाठी रोज २३ तास खुला राहील. व्हीआयपी लोकांसाठी तिकीट दिले जाईल.
राणीच्या दर्शनासाठी त्यांना विशिष्ट वेळ दिली जाईल. त्यानंतर चार्ल्स वेल्स शोकसभा आयोजित करतील. अंतीम संस्काराचा दिवस राष्ट्रीय शोकसभेचा असेल. संपूर्ण ब्रिटनमध्ये दोन मिनिटांचा मौन पाळला जाईल. असा असेल १० दिवसांचा विधी.