संदीप राजगोळकर, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : सलग तीन आठवडे सुरू असलेली महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आज संपणार अशी स्थिती होती. मात्र, आजही ही सुनावणी पूर्ण झाली नाही. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई ( Anil Desai ) यांनी आज ही सुनावणी संपेल अशी शक्यताही वर्तवली होती. मात्र, आज एकनाथ शिंदे यांचे वकील हरिष साळवे ( ADV Harish Salve ) यांची एन्ट्री आजच्या सुनावणीत झालीय. त्यांनी युक्तिवाद करत उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा यावेळेला त्यांनी मांडला असून आता ही सुनावणी आणखी दोन दिवस होणार आहे. 14 मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडणार आहे. दोन दिवस ही सुनावणी चालणार असून दोन्ही बाजूचे वकील यावेळी युक्तिवाद करणार आहे.
सर्वोच्च न्यायायलातील सुनावणी पार पडल्यानंतर पुढील तारीख देण्यात आली आहे. 14 मार्चला ही सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आणखी लांबणार असल्याची परिस्थिती सध्या आहे.
आज झालेल्या सुनावणीत जेष्ठ वकील हरिष साळवे यांनी या प्रकरणात पहिल्यांदाच युक्तिवाद केला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू मांडल्यानंतर पुढील तारीख देण्यात आली आहे. 14 मार्चला आता पुढील सुनावणी होणार आहे.
आजच्या सुनावणीत हरिश साळवे यांनी युक्तिवाद करत असतांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जायला हवं होतं असा युक्तिवाद केला आहे.
हरिष साळवे यांचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी जाहीर केली असून दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे. त्यादरम्यान शिवसेना आणि ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहे.
विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकाराबाबत पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. असा अंदाज वकील सिद्धार्थ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना व्यक्त केला आहे. गेल्या तीन आठवड्यापासून सुरू असलेली सुनावणी आता आणखी दोन आठवडे लांबणीवर पडली आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीत काय निर्णय येणार यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. त्यामध्ये आता एकनाथ शिंदे यांचे वकील हरिश साळवे यांनी या प्रकरणात युक्तिवाद केला आहे. त्यामुळे अधिक सुनावणी लांबण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन ठेपला. त्यानंतर सहा ते सात महिन्यांपासून याबाबत प्रकरण सुरू असून अंतिम टप्प्यात ही सुनावणी आली आहे.