नवी दिल्ली : अचानक कार अनियंत्रीत होऊन ३०० फूट खोल दरीत कोसळली. परंतु, कारमध्ये बसलेल्या नवरा-बायकोचा जीव वाचला. कारचालकानं सांगितलं की, असा चमत्कार १० कोटी घटनांपैकी एखाद्यासोबत होते. कार पडली तिथूनंच पत्नीनं आयफोनद्वारे तत्काळ कॉल केला. त्यानंतर त्यांना हेलिकॅप्टरनं बाहेर काढण्यात आलं. ३०० फूट खोल दरीत कार कोसळली. त्यानंतरही पती-पत्नीचा जीव वाचला. दरीत कोसळल्यानंतर आयफोनच्या माध्यमातून तात्काळ एसओएस सर्व्हीसला फोन केला. त्यानंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाची टीम आली. विशेष म्हणजे ३०० फूट खोल दरीत पडूनही पती-पत्नीला फक्त जखमा झाल्या. ही घटना अमेरिका येथील कॅलिफोर्निया येथे घडली.
क्लो फिल्ड्स आणि त्यांची पती क्रिस्टीयन जेल्डा यांनी स्वतः जीव वाचल्याच्या घटनेला चमत्कार असल्याचं म्हंटलं. १३ डिसेंबरला हे जोडपे कॅलिफोर्नियाच्या एंजेल्स नॅशनल फॉरेस्ट परिसरातून कारने जात होते. कार क्रिस्टीयन चालवत होता. मागून येणाऱ्या कारला क्रिस्टीयननं समोर जाऊ देण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची कार अनियंत्रित झाली. मंकी दरीत ३०० फूट खोल पडली.
क्रिस्टीयननं सांगितलं की, कार आधी काही झाडांना आदळली. ते दोघेही कारच्या छतावर आले. या घटनेत दोघांनाही थोडीफार जखम झाली. दोघेही बाजूला होऊन बाहेर निघाले. यापूर्वीही याठिकाणी काही घटना घडल्या. त्यात कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला. अशावेळी ही घटना चमत्कारचं असल्याचं लॉस एंजीस्ल काउंटी शेरीफ सर्जंट गिल्बर्ट म्हणाले.
घटनेत क्लोच्या आयफोन तुटला. जिथं त्यांची कार पडली तिथं सिग्नल किंवा नेटवर्कही नव्हता. पण, क्लोनं आयफोनच्या तात्काळ एसओएस फीचरचा उपयोग केला. या फीचरनं सिग्नल किंवा वायफाय नसतानाही संपर्क केला जातो.
शेरीफ डिपार्टमेंटला दुपारी दोन वाजता अॅपलच्या तात्काळ कॉल सेंटरवरून कॉल आला. त्यांचा लोकेशन शेअर करण्यात आला. बचाव पथक त्यांना वाचविण्यासाठी घटनास्थळी पोहचले. दोघांनाही हेलिकॅप्टरनं बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.