14 व्या प्रश्नाने मोठ्या कटाचा खुलासा? संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना 18 सवाल; काय काय विचारलं?

| Updated on: Dec 16, 2023 | 4:34 PM

संसदेत घुसखोरी करणाऱ्या चारही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्या आणखी एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. या सर्वांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी कट कसा आखला? त्यांना कट आखण्यास कोणी प्रोत्साहित केलं? कटामागे आणखी कोण कोण आहे? आणि या षडयंत्रामागचा हेतू काय? असे सवाल या चारही जणांना केले जात आहेत.

14 व्या प्रश्नाने मोठ्या कटाचा खुलासा? संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना 18 सवाल; काय काय विचारलं?
Parliament Security Breach case
Follow us on

नवी दिल्ली | 16 डिसेंबर 2023 : तीन दिवसांपूर्वी म्हणजे 13 डिसेंबर रोजी संसदेत दोन तरुणांनी घुसखोरी करून प्रचंड गोंधळ घातला. त्यानंतर दुसऱ्या दोन जणांनी संसदेबाहेर गोंधळ घातला. या घुसखोरांनी संसदेत आणि संसदेच्या बाहेर स्मोक कँडल फोडून धुडगूस घातला. त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आरोपींचे सोशल मीडिया प्रोफाईल खंगाळत आहेत. हे षडयंत्र कसं रचलं? याची माहिती घेण्यासाठी पोलीस सोशल मीडियाची झाडाझडती घेत आहेत. आरोपींनीही पोलिसांना ते कसे भेटले आणि त्यांचा हेतू काय होता याची माहिती पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी झालेल्या संसदेतील घुसखोरी प्रकरणी महेश कुमावत नावाच्या एका व्यक्तीलाही अटक केली आहे. पोलीस या सर्व आरोपींचा हेतू आणि त्यांची पार्श्वभूमी चेक करत आहेत. पोलिसांना आरोपींच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून षडयंत्राचे धागेदोरे सापडले आहेत. आरोपींच्या चॅटमधून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. पोलिसांनी या सर्व आरोपींना एकूण 18 सवाल केले आहेत. त्यातून पोलिसांना या तरुणांचा हेतू समजणार आहे. त्यातील 14 प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. या 14 व्या प्रश्नामुळे हल्लोखारांचे कुणाशी संबंध आहेत का? त्यांना कोणी तरी ऑपरेट करतंय का? याची माहिती मिळणार आहे.

18 सवाल खालील प्रमाणे…

तुम्ही सर्वजण कुठे भेटला होता?

हा डाव यशस्वी करण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं होतं?

कुणी काय करायचं? संसदेच्या आत कोण जाणार? कोण बाहेर थांबणार हे कुणी ठरवलं होतं?

तुमची भेट कधी झाली? ही घटना तडीस लावण्याची प्लानिंग कधी सुरू झाली?

हा कट तडीस नेण्यासाठी तुमची किती वेळा आणि कुठे कुठे भेट किंवा बैठक झाली?

स्मोक कँडलचा प्लॅन कुणाचा होता? कोण स्मोक कँडल घेऊन आलेला?

स्मोक कँडल कुठे खरीदी केली होती? तुम्ही किती स्मोक कँडल खरेदी केल्या होत्या?

13 डिसेंबरचीच तारीख का निवडली? हा दिवस कुणी ठरवला होता?

तुमच्या या षडयंत्रात तुम्हीच आहात की आणखी कोणी आहेत? या षडयंत्राची इतरांनाही माहिती होती का?

घटनेच्या दिवशी तुमच्यासोबत कोण कोण होते?

त्या दिवशी सर्वात आधी तुम्ही कुठे पोहोचलात?

ललित सर्वांचे फोन जवळ ठेवेल आणि व्हिडीओ बनवेल हे कोणी ठरवलं होतं?

या घटनेमागचा खरा हेतू काय होता?

देशाचे दुश्मन किंवा इतर दहशतवादी संघटनांशी तुमचा संबंध आहे काय?

तुम्ही कोणत्या संघटनेशी संबंधित आहात? देशात झालेल्या कोणत्या कोणत्या निदर्शनात तुम्ही भाग घेतला?

ललित झा याला विचारलेले प्रश्न…

तुम्ही फरार झाल्यानंतर कुणा कुणाच्या संपर्कात होता?

तुम्ही ज्या हॉटेलात थांबला होता, ती हॉटेल कुठे आहे?

कट यशस्वी होण्यासाठी आर्थिक घेवाणदेवाण कशी झाली? फंडिंग कुठून आली?