नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेतील गोंधळ, दिशा सालियानच्या मृत्यूची एसआयटी चौकशी, राहुल शेवाळे यांनी केलेले आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोप यांसह एनआयटी भूखंड घोटाळ्याच्याबाबत सुरू असलेल्या आरोपांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचार केला असून त्याच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली असती म्हणून आज दिवसभर दोन्ही सभागृहात गोंधळ घालण्यात आल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. संजय राऊत म्हणाले राहुल शेवाळे यांनी काही कारण नसताना एक मुद्दा उपस्थित केला, कारण नसताना ते घसरले. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी झाली. विधानसभेत देखील विषय हा चर्चिला गेला, राहुल शेवाळे यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का? असाही थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
सुशांत सिंग राजपुत मृत्यूचा तपास सीबीआय, महाराष्ट्र पोलिसांनी केला आहे. सीबीआय ने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुशांत सिंह ने आत्महत्या केली असा अहवाल दिला आहे.
हे प्रकरण एनआयटी भूखंड घोसाळ्यामुळे काढण्यात आला आहे, रेवड्या वाटतात त्या प्रमाणे भूखंड वाटले. यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी हे प्रकरण काढण्यात आल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
16 भूखंड घोटाळ्याचं प्रकरण मोठं आहे. चंद्रकांत बावनकुळे यांच्यासह विदर्भातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. हे प्रकरण बाहेर काढण्यात भाजपच्या नेत्याचा हात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जो पर्यंत मी आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं वक्तव्य केलं होतं. शंभर कोटीचा भूखंड प्रकरणात मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार अशी स्थिती आहे.
हे सरकार फेब्रुवारी पर्यंत टिकणार नाही, शंभर कोटीचे भूखंड दोन कोटीला विकले गेले आहेत. इडी सीबीआयला, गृहखात्याला हे प्रकरण दिसत नाही का ? असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, यामिनी जाधव यांच्या फाइल का बंद झाल्या ? तुमच्या फाइल उघडायला लावू नका, तुमच्या फाइल सेंट्रल हॉल पर्यंत जाणार. आमच्या भ्रष्टाचारावर बोलणारे किरिट सोमय्या कुठं गेले आहेत असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
29 मे 2022 ला सचिवाने पत्र देऊनही हा व्यवहार तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी हा व्यवहार केला, मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी यावर मोहोर उठवली, हायकोर्टाने या प्रकरणावर ताशेरे ओढले होते तरीही हा व्यवहार झाला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.