‘The Kashmir Files’वरुन अरविंद केजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा: म्हणाले, ‘अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घेण्याची वेळ’!

| Updated on: Mar 24, 2022 | 11:52 PM

'8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही', अशा शब्दात केजरीवाल यांनी मोदींवर हल्ला चढवला.

The Kashmir Filesवरुन अरविंद केजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा: म्हणाले, अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घेण्याची वेळ!
द काश्मिर फाईल्सच्या मुद्द्यावरुन केजरीवालांची पंतप्रधान मोदींवर टीका
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : द काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटावरुन सध्या देशभरात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राजकारणासोबतच या चित्रपटाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद आणि कमाईच्या आकड्यांवरुन चर्चेत आहे. काही भाजपशासित राज्यात हा चित्रपत करमुक्त करण्यात आलाय. दिल्लीतही भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. ‘8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही’, अशा शब्दात केजरीवाल यांनी मोदींवर हल्ला चढवला.

संपूर्ण भारतीय जनता पार्टी देशभरात एका चित्रपटाचे पोस्टर लावत आहे. असे चित्रपटाचे पोस्टर लावण्यासाठी तुम्ही राजकारणात आले होते काय? तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन? मुलं विचारतील बाबा काय काम करता? त्यांना सांगाल का चित्रपटाचे पोस्टर लावतो म्हणून. 8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही. 8 वर्षे खराब केले. विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी त्यांना लोळण घ्यावं लागत आहे की वाचव वाचव वाचव म्हणून… अशा शब्दात अरविंद केरजीवाल यांनी द काश्मिर फाईल्सच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

अरविंद केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

विवेक अग्निहोत्रीला राज्यभेत पाठवा- सज्जात लोन

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी विवेक अग्निहोत्रींना राज्यसभेचं खासदार बनवावं. अन्यथा ते अजून काय करतील याचा नेम नाही. सध्या एक नवा ट्रेंड आला आहे की, विवेक अग्निहोत्री आणि अनुपम खेर यांच्यासारखे लोक राज्यसभेत जाण्यासाठी आतूर आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवावं. नाहीतर ते देशात द्वेष पसरवण्याचं काम करत राहतील”, अशी खोचक टीका जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांनी केलीय.

पंतप्रधान मोदींकडून चित्रपटाचं कौतुक

द काश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 मार्च रोजी, दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी आणि चित्रपटाचे निर्माते अभिषेक यांच्यासह चित्रपटाच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी मोदींनी त्यांचं अभिनंदन करत चित्रपटाचं कौतुक केलं होतं. “द काश्मीर फाईल्स हा खूप चांगला चित्रपट आहे. तुम्ही सर्वांनी तो पाहावा. असे चित्रपट आणखी बनवले गेले पाहिजेत. अशा चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना सत्य कळतं आणि भूतकाळात घडलेल्या घटनांना कोण जबाबदार होते हेदेखील समजतं. कोणी शोषण केलं किंवा कोणी चांगलं काम केलं हे सांगण्याचा प्रयत्न यांसारखे चित्रपट करतात”, अशा शब्दांत मोदींनी कौतुक केलं. ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता चित्रपटाला विरोध करत आहेत, असंही ते म्हणाले.

इतर बातम्या :  

The Kashmir Files कोरोनानंतरचा ब्लॉकबस्टर चित्रपट; रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ला ही कमाईत टाकलं मागे

‘ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे..’; The Kashmir Files बद्दल शरद पोंक्षेंचं रोखठोक मत