बिहार : मुजफ्फरपुरच्या (Muzaffarpur) मोतीपूरमध्ये पतीने आपल्या गरोदर पत्नीला गोळी मारुन हत्या केली आहे. महवल कुशाही गावातील हा प्रकार असल्याचं बिहार पोलिसांनी (Bihar Police) सांगितलं आहे. रविवारी आकाश कुमार याने पत्नी काजल कुमारी (kajal kumari) (20 वर्षीय) गोळी मारुन हत्या केली. ही घटना झाल्यानंतर पती तिथल्या दोन साथीदारांसह तिथून फरार झाला आहे. पाच महिन्यापुर्वी दोघांचं लग्न झालं होतं. पत्नी आई होणार होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर पत्नीच्या मृतदेह माहेरच्या लोकांकडे देण्यात आला आहे. महिलेच्या डोक्यात गोळी मारण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांना तिथं संशयास्पद असं काहीचं सापडलेलं नाही.
लोकांनी सांगितल्याप्रमाणे आकाश रविवारी दुपारी आपल्या दोस्तांसोबत बाईकवरुन घरी आला होता. त्यावेळी तो सरळ घरात गेला आणि पत्नी काजोलला गोळी मारली. काजलच्या डोक्यात गोळी मारल्यामुळे तिचा जागीचं मृत्यू झाला. जोराचा आवाज झाल्यामुळे आकाशची आई आणि बहिण तिथं गेली. त्यावेळी आकाश तिथून पळून गेला आहे.
काजलला तिथल्या रुग्णालयात घेऊन गेले होते. परंतु तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. काजलच्या आईने सांगितले की, ज्यावेळी काजलचं लग्न झालं त्यावेळी त्यांच्याकडे मोठी रक्कम मागितली होती. परंतु ती रक्कम न दिल्यामुळे तिला सासरच्या लोकांकडून कायम मारहाण होत होती. गरोदर असल्यामुळे २० लाख रुपये मागत होते असं काजलची आई नीलम देवी यांनी पोलिसांना सांगितलं आहे, त्याचबरोबर एक स्कॉर्पिओ गाडी सुध्दा मागितली होती. या कारणामुळे दोघांच्यात कायम वाद होत होते.
हत्या झाल्याचं समोर आल्यानंतर आता पोलिस त्या चौकशीत गुंतले आहेत. घरातील सगळ्यांची चौकशी सुरु आहे. त्याचबरोबर फरार आरोपीचा देखील शोध सुरु आहे.