Perseid Meteor Shower 2023 : पुढच्या आठवड्यात अवकाशात अद्भूत नजारा, नयनरम्य उल्का वर्षाव पाहता येणार

| Updated on: Aug 04, 2023 | 9:51 PM

स्विफ्ट टटल धूमकेतू जेव्हा सूर्याच्या बाजूने जातो तेव्हा त्याच्या शेपटीतील ग्रहांचे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात दरवर्षी शिरत असतात.

Perseid Meteor Shower 2023 : पुढच्या आठवड्यात अवकाशात अद्भूत नजारा, नयनरम्य उल्का वर्षाव पाहता येणार
perseids in night time
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 4 ऑगस्ट 2023 : आकाश, चंद्र आणि ताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ऑगस्टचा पुढचा आठवडा महत्वाचा आहे. यावेळी अवकाशात अद्भूत नजारा दिसणार आहे. परसीड उल्का वर्षावाचा ( Perseid Meteor Shower ) नजारा आकाशात पहायला मिळणार आहे. 11 ते 13 ऑगस्टच्या मध्यरात्री हा खास आकाशातील आतीषबाजीचा खेळ पाहायळा मिळणार आहे. या दिवशी दर तासाला सुमारे 100 उल्का पृथ्वीच्या वातावरणात शिरताना तेजस्वी चमकताना दिसतील.

सूर्याभोवती फिरणाऱ्या धूमकेतू स्विफ्ट टटलचे अवशेष पृथ्वीच्या वातावरणात आल्यास हा उल्का वर्षाव होतो. सूर्याभोवती फिरत असताना धूमकेतूची शेपटी पृथ्वीच्या वातावरणात आल्यास हा नयनरम्य सोहळा पाहायला मिळतो. दरवर्षी 14 जुलै ते 1 सप्टेंबरमध्ये हा उल्कावर्षाव पाहायला मिळत असतो. परंतू 13 ऑगस्ट रोजी त्याचा पिकअवर असतो. हा वर्षातील सर्वोत्तम उल्का वर्षाव म्हटला जातो. या उल्का वर्षावात 50 ते 100 उल्का दर तासाला पाहायला मिळता. त्या पृथ्वीच्या वातावरणात त्या शिरताना जळून नष्ट होताना त्याचे अग्नी गोळे सरळ रेषांमध्ये रंगीबेरंगी रंग उजळत आकाशात आतीषबाजी करताना दिसणार आहेत.

सर्वात मोठा धूमकेतू 

स्विफ्ट टटल धूमकेतू जेव्हा सूर्याच्या बाजूने जातो तेव्हा त्याच्या शेपटीतील ग्रहांचे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात दरवर्षी शिरत असतात. त्यावेळी घर्षणाने ते जळून नष्ट होतात. त्याची आकाशात सुंदर आकृती दिसते. नॉर्दन हेमीस्पीअरमधून 12 ऑगस्टच्या पहाटे हा नजारा पाहायला मिळणार आहे. स्विफ्ट टटल हा धूमकेतू 133 वर्षांनी सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. या धूमकेतूने यापूर्वी 1992 रोजी सूर्यमालिकेला भेट दिली होती. स्विफ्ट टटल या धूमकेतूचा शोध 1862 रोजी लुईस स्विफ्ट आणि होरेस टटल यांनी लावला होता. हा सर्वात मोठा धूमकेतू असून त्याची केंद्रका पासूनची लांबी 26 किलोमीटर इतकी आहे.