भारतातील ‘या’ राज्यांची लोकसंख्या काही देशांपेक्षा जास्त, लवकरच चीनलाही टाकणार मागे

| Updated on: Nov 11, 2022 | 8:04 PM

लोकसंख्येच्या बाबतीत 2023 मध्ये भारत चीनलाही मागे टाकणार असल्याचा धक्कादायक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारतातील या राज्यांची लोकसंख्या काही देशांपेक्षा जास्त, लवकरच चीनलाही टाकणार मागे
भारताची लोकसंख्या
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  सध्या देशात आणि जगात पुन्हा एकदा लोकसंख्येची (Population) चर्चा जोरात सुरू आहे. संयुक्त राष्ट्राने नोव्हेंबर महिन्यात जगाची लोकसंख्या 800 दशलक्ष होण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा स्थितीत पृथ्वी 800 कोटी लोकसंख्येचा भार पेलणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सगळ्यांमध्ये जगाचे लक्ष भारताच्या लोकसंख्येकडे (Population of India) देखील असल्याचे वेळोवेळी दिसून येते. धक्कादायक बाब म्हणजे 2023 मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे.  त्यामुळे भारतासाठी साहजिकच जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर आव्हाने आहेत. भारतातील काही राज्यांची लोकसंख्या जगातील अनेक देशांपेक्षा जास्त आहे.

2023 मध्ये चीनला मागे टाकणार भारत

युनायटेड नेशन्सच्या जुलै 2022 च्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स, 2022 अहवालानुसार, 2023 मध्ये भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल. म्हणजेच पुढील वर्षी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. अहवालानुसार 2022 मध्ये चीनची लोकसंख्या 1426 दशलक्ष असेल तर भारताची लोकसंख्या 1412 दशलक्ष असेल. भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 17 टक्के आहे.

डब्ल्यूडब्ल्यूएफ आणि ग्लोबल प्रिंट नेटवर्कच्या 2022 च्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या पाहता, पृथ्वीवरील जैविक संसाधनांमध्ये 171 टक्के कमतरता आहे. ही तूट खूप मोठी आहे.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे, राज्यांच्या आधारावर पाहिले तर भारतातील अनेक राज्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपेक्षा जास्त आहेत. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशची लोकसंख्या सध्याच्या अंदाजानुसार 23 कोटींवर पोहोचली आहे. या आधारावर तो जगातील पाचव्या क्रमांकाच्या लोकसंख्येच्या देशाच्या मानांकनावर पोहोचला आहे. सध्या पाकिस्तानची लोकसंख्या तितकीच आहे. त्याच वेळी, ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश, रशिया, मेक्सिको सारखे टॉप-10 देश मागे पडले आहेत.